Business Idea : दिवाळीत सुरु करा ‘हे’ व्यवसाय; होईल मोठी कमाई

Business Idea : वर्षातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आली असून सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीला पणत्या, नवीन कपडे, आकाशकंदील, फटाके खरेदी करणे अशा प्रकारची मोठी खरेदी सर्वच जण करत असतात. त्यामुळे सिझनेबल व्यवसाय करणाऱ्यांची सुद्धा मोठी चांदी होते. तुम्ही सुद्धा दिवाळीनिमित्त नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही आयडियास देऊ ज्यांचा वापर करत तुम्ही नक्कीच या दिवाळी सणात भरपूर कमाई करू शकता. कोणताही व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होतो गरज असते ती मेहनत घेण्याची. जर का तुमच्यात मेहनत करण्याची ताकद असेल तर संधी अनेक उपलब्ध आहेत…

१) दिव्यांचा व्यवसाय:

दिवाळी हा प्रकाशाचा आणि रोषणाईचा सण आहे, दिव्यांशिवाय या सणाला काही अर्थच नाही मुळी. त्यामुळे जर का परिस्थितीचा अंदाज घेत तुम्ही दिव्यांचा व्यवसाय सुरु केलात तर अर्थातच दिवाळीमध्ये भरपूर कमाई केली जाऊ शकते. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या पणत्या उपलब्ध होत आहेत, काही रंगीत तर काही विविध आकाराच्या. त्यामुळे लोकांच्या आवडी ओळखून त्यानुसार व्यवसाय सुरु केलात तर नक्कीच यशस्वी व्हाल.

२) इलेक्ट्रोनिक लाईटस: Business Idea

जसं वरती म्हटलं, दिवाळी हा दिव्यांचा सण असल्यामुळे अनेकांना यावेळी आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर अनेक दिव्यांच्या प्रकाशात उजळून टाकायला आवडते. इलेक्ट्रिक लाईटस यात भर घालतात. अनेक रंगांनी घर आणि अंगण खुलून निघतं, आणि या व्यवसायाला (Business Idea) भरपूर मागणी असल्यामुळे तुम्ही याची सुरुवात करू शकता.

३) फराळाचे समान:

जसा दिवाळी हा दिव्यांचा सण आहे तसाच तो विविध प्रकारांच्या फराळाचा सण आहे. शंकरपाळ्या, शेव-चिवडा, चकली, लाडू यांच्या खमंग वासाने स्वयंपाकघर भरून जातं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला वेळ काढत फराळ करत बसायला वेळ नाही. पण तरीही जिभेवरची चव कायम राहावी म्हणून ग्राहक एका अस्सल विक्रेत्याच्या शोधात असतात. तुम्हीच या दिवाळीपासून तो अस्सल विक्रेता बनत लोकांना दर्जेदार पदार्थ खाऊ घालू शकता.