Business Idea : नारळाच्या करवंटीपासून बनवा शोभेच्या वस्तू; सुरु करा एक भन्नाट व्यवसाय

Business Idea : माणसाची विचार करण्याची शक्ती त्याला इतर जीवांपेक्षा वेगळं बनवते. विचार करण्याची क्षमता असल्यामुळे आपण हातात काही नसताना सुद्धा दुनिया उभी करू शकतो. विचारांना थोडीशी चलना मिळाली तर नवनवीन कल्पना सुचतात, अश्या ज्या Google सुद्धा देऊ शकत नाही. यात आपली मेहनत असते कुणाकडून मिळवलेली उधारी नाही. देशाच्या दक्षिण भागात केरळ नावाचं एक सुंदर शहर आहे. कोकण आणि गोवा यांच्याप्रमाणे केरळसुद्धा माडा पोफळीसाठी ओळखलं जातं. इथे राहणाऱ्या एका 26 वर्षांच्या मुलीने केवळ आपल्या विचारांना चालना देऊन एक भन्नाट व्यवसाय सुरु केला आहे, काय आहे हि कल्पना पाहूया(Business Idea).

नारळाच्या कर्टीपासून सुरु केला व्यवसाय: Business Idea

केरळमध्ये राहणाऱ्या मारिया कुरीयाकोसने नारळाच्या कर्टीपासून एक उत्तम व्यवसाय सुरु केला आहे. इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवतो तेव्हा आपोआपच आपलं नाव होतं, त्याचप्रमाणे व्यवसायातून मारियाने पैसा तर भरपूर कमवला पण सोबतच नाव देखील कमावलं. मारियाने Bsc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे, मात्र काही कारणामुळे नोकरीत मन न रुळल्यामुळे नोकरी सोडून तिने हा व्यवसाय सुरु केला.

घरात नारळ खोवून झाल्यानंतर राहिलेली कर्टी आपण काय करतो? फेकुनच देतो, पण तुम्हाला माहिती आहे का मारियाने याच टाकाऊ गोष्टीपासून बाउल आणि दिवे बनवले आणि तिचा व्यवसाय खुलवला. आजकाल पर्यावरणाला सोयीस्कर गोष्टी निवडण्याचा प्रयत्न आपण करतो. किंवा बहुतेक लोकं अश्याच गोष्टींना प्राधान्य देतात. यामुळे काय झालं तर मारियाच्या या व्यवसायाला वेगवेगळ्या हॉटेल्सकडून मागणी येऊ लागली. मारिया सांगते कि हा व्यवसाय (Business Idea) सुरु करण्याआधी तिने या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कारागिरांची चर्चा केली होती.

तुम्ही देखील सुरु करू शकता असा एक व्यवसाय

पैसे कमवण्यासाठी काही कुठे नोकरीच करण्याची गरज नाही. उलट जर का तुमच्याजवळ एखादी कला असेल तर त्याला खत-पाणी घालत तिला मोठं करावं. कारण कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी हि बंद होऊ शकते याचच एक उदाहरण आपण कोविडच्या वेळी पाहिलं पण माणसाजवळ असलेली कला कधीच जुनी होत नाही किंवा तिला मरण येत नाही.

तर हा नारळाच्या कार्टीचा व्यवसाय कसा सुरु कराल? विशेषता दक्षिण भारतात हि कला तुम्हाला शिकायला मिळेल किंवा जवळपास असेल्या एखाद्या कारागिराची मदत घेतली जाऊ शकते. नारळाच्या टाकाऊ अवशेषांपासून चहाचे कप, दिवे,बाउल किंवा सुशोभिकरणाच्या गोष्टी बनवता येतात. या व्यवसायातून तुम्ही भरपूर पैसा नक्कीच कमवाल कारण मारिया छोट्या नारळाच्या कलाकारीसाठी जी आकाराने छोटी असते (150mm) अश्यासाठी 250 पर्यंत शुल्क आकारते तर मोठ्या कलाकारीसाठी (900mm) 960 अशी किंमत सांगते(Business Idea). काही दिवसांतच दिवाळीचा सण येणार आहे, त्यामुळे लोकं नक्कीच अश्या भन्नाट गोष्टींच्या शोधात असतील, त्यामुळेआता वेळ न दवडता या कल्पनेचा विचार करा आणि पटकन काम सुरु करा.