Business Idea : रेल्वे स्थानकावर सुरु करा दुकान; पहा संपूर्ण प्रोसेस आणि खर्च

Business Idea: आजूबाजूची परिस्थिती जवळून पहिलीत तर तुमच्या लक्षात येईल कि व्यवसाय हा कुठेही सुरु केला जाऊ शकतो. जशी लोकांची गरज तशी व्यवसायाला मागणी. त्यामुळे जर का लोकांच्या गरजा तुम्ही बिनचूक ओळखल्यात तर नक्कीच एक चांगला आणि यशस्वी व्यवसाय करता येतो. आज आम्ही एक अनोखी कल्पना तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, तुम्ही कधी रेल्वे स्थानकावर व्यवसाय करण्याचा विचार केला आहे का? नसेल तर आता करा आणि याबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

रेल्वे स्थानकावर व्यवसाय : Business Idea

तुमच्या आजूबाजूला नजर फिरवा, कितीतरी लोकं आजही रेल्वेचा प्रवास करतात. हा प्रवास तेवढाच आरामदायी आणि सुखकर वाटतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरची गर्दी काही कमी होणार नाहीये. याच परिस्थितीचा आपल्या बाजूने फायदा करून घेत तुम्ही इथे एक फूड स्टोल (Food Stall) उभा करू शकता. भारतातली रेल्वे सेवा अप्रत्क्षपणे 14 लाख लोकांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करवून देत असते, आणि तुम्ही देखील याचाच एक भाग बनू शकता.

रेल्वेचा प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेलच कि कितीतरी लोकं फूड स्टोल उभारून आपला दैनंदिन व्यवसाय करत असतात. त्या स्थानकाची विशेषता असणारा पदार्थ किंवा चहा, कॉफी यांसारखे पेय तुम्ही प्रवाशांपर्यंत पोहोचवू शकता. अगदी मोठा व्यवसाय सुरु करायचा असेल तर रेल्वे स्थानकावर केटरिंग डेन्टर सुरु करता येते. प्रवाशांच्या आवडीचे, प्रवासात खायला सोपे आणि पोटभरीचे पदार्थ जर का तुम्ही ठेऊ शकलात तर या व्यवसायाला (Business Idea) आणि स्पर्धा नाही. मात्र हे पदार्थ स्वच्छ असतील याची काळजी घ्या.

कसा सुरु करायचा व्यवसाय ?-

व्यवसाय सुरु करायचं असेल तर IRCTS ला अर्ज करून परवाना मिळवावा लागतो, आणि केवळ 40 हजार ते 3 लाख रुपयांच्या खर्चात हा व्यवसाय सुरु (Business Idea) करता येतो. कोणतं रेल्वे स्थानक आहे, त्यानुसार याची किंमत ठरलेली असते. अर्ज करत असताना तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे असणं आवश्यक आहे. तसेच रेल्वेच्या काही अटी आणि नियमांचे पालन तुम्हाला करावं लागेल.