Business Idea : टोमेटो सॉसचा व्यवसाय तुम्हाला मिळवून देईल भरपूर पैसा; दिवसेंदिवस वाढतेय मागणी

बिझनेसनामा ऑनलाईन । तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायची इच्छा आहे, पण तो इतरांपेक्षा वेगळा असावा असं वाटतंय का? तीच तीच कामं न करता आपण काही तरी वेगळं करावं असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक कल्पना सुचवणार आहोत (Business Idea). या कल्पनेचा वापर करून तुम्ही नक्कीच लाखो रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय म्हणजे टोमॅटो पासून सुरु होणार व्यवसाय आहे. त्याला शहरातच नाही तर गावांत सुद्धा भरपूर मागणी आहे, हि मागणी कधीच कमी देखील होणार नाही. तर आम्ही बोलत आहोत टोमेटोच्या सॉस बद्दल( Tomato Sauce). हा एक असा व्यवसाय आहे जिथे दिवसेंदिवस भरपूर कमाई केली जाऊ शकते, कारण बाजारात त्याला मागणी फार आहे.

का चालेल टोमेटोच्या सॉसचा व्यवसाय? (Business Idea)

तुम्ही निट विचार केला तर लक्षात येईल कि आपल्या घरात टोमेटोच्या सॉसला आपल्या घरातच किती पसंत केलं जातं. केवळ लहान मुलंच नाही तर मोठ्या लोकांना सुद्धा टोमेटोच्या सॉसची गोडी लागलेली आहे. अनेकवेळा आपण विदेशी पदार्थ घरी बनवून पाहतो , अश्यावेळी टोमेटोच्या सॉसची विशेष गरज असते. या शिवाय विविध हॉटेलमध्ये पिझ्झा, बर्गर यांसारख्या गोष्टी टोमेटोच्या सॉसशिवाय अपुरे पडतात.

टोमॅटो सॉसच्या व्यवसायाची सुरुवात कशी कराल?

हा व्यवसाय (Business Idea) सुरु करण्यासाठी तुम्हाला काही मशिन्सची गरज लागेल, ज्यासाठीचा खर्च दोन लाख पर्यंत जाऊ शकतो. या नंतर टोमेटो विकत घेणे, कामगारांचा पगार, पॅकिंग इत्यादी गोष्टींचा एकूण खर्च सहज पाच लाखांपर्यंत जाईल. मात्र भारत सरकारकडून तुम्हाला मदत मिळू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत काही रक्कम सरकार कडून दिली जाईल. जर का तुमचा एकूण खर्च 7 लाख असेल तर तुम्हाला केवळ 1 ते 2 लाखांचा खर्च येईल कारण बाकी सर्व रक्कम स्वरकारकडून मदत म्हणून दिली जाईल.

कसं बनवाल टोमेटो सॉस आणि किती होईल कमाई?

टोमेटो सॉस बनवण्यासाठी सर्वात आधी टोमेटो शिजवून घ्यावेत, त्यानंतर Pulp मधून बिया आणि फायबर बाजूला करून घ्यावेत. यानंतर पुढे आलं,लसूण,लवंग,मीठ,साखर,विनेगर इत्यादी पदार्थ घालावे लागतात. हे टोमेटो सॉस दीर्घकाळ टिकाव म्हणून त्यात प्रीझरवेटीव्झ वापरले जातात. या व्यवसायातून दर महिन्याला अंदाजे ५० हजार रुपयांची कामाई नक्कीच केली जाऊ शकते. त्यामुळे जर का तुम्ही खरोखरच एखादा व्यवसाय करण्याच्या विचार असाल तर हा विचार नक्कीच करावा.