Business Idea : फक्त 20 हजारात सुरु करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल भरपूर नफा

Business Idea | एखादा व्यवसाय सुरु करण्याआधी काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं असत. जसं कि कोणता व्यवसाय सुरु करायचा आहे, किती पैसे गुंतवण्याची गरज आहे, बाजारात तुमचे प्रतिस्पर्धी कोण असणार आहेत इत्यादी. सोबतच व्यवसायाची जेव्हा तुम्ही नीट आखणी करून घेता तेव्हा तो व्यवसाय आपोआपच सुरळीत चालतो. देशात असे अनेक व्यावसायिक आहेत जे या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळतात आणि म्हणूनच त्यांचे व्यवसाय आज यशस्वी आहेत. पण जर का या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा तुम्ही फक्त कमी पैश्यांमुळे अडकून राहिला असाल तर काळजी करू नका, आम्ही त्यावरही मार्ग सुचवू. इथे आम्ही काही असे व्यवसाय (Business Idea) दिलेले आहेत ज्यांची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अधिक पैश्यांची गरज नाही. केवळ 20000 रुपयांत या व्यवसायांची सुरुवात केली जाऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

१. लोणची बनवणे:

आपण कितीही पुढारलेले असलो तरीही काही गोष्टी अजून आपल्याला जुन्या परमाप्रेशी जोडून ठेवतात. त्यातीलच एक म्हणजे खाद्य परंपरा. आपल्या जेवणात लोणच्याला पर्याय नाही. लिम्बाचं लोणच, आंब्याचं लोणच, मिर्चीच लोणच इत्यादी अनेक प्रकारची लोणची तुम्ही चाखलीच असेल. आणि आता तुम्ही यांचा वापर करून व्यवसाय देखील सुरु करू शकता(Business Idea). बाजारात लोणच्याची मागणी काही कधी कमी होणार नाही त्यामुळे हा व्यवसाय आरामात 20 तर 25 हजारात सुरु करता येतो.

२. कंटेंट रायटर:

तुम्हाला लिहायची किंवा वाचायची आवड आहे? आणि तुम्हाला असं वाटतं कि सर्वात जास्त शब्द्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला उत्तमरीत्या मांडू शकता? तर कंटेंट रायटिंग(Content Writing) हा व्यवसाय तुमच्यासाठी खरोखरच योग्य आहे.कंटेंट रायटर म्हणून तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी, डिजिटल मिडियासाठी लिखाण सुरु करू शकता. हा व्यवसाय सुरु करायला खरं तर पैश्यांची काहीह गरज नाही, फक्त गरज आहे ती कौशाल्ल्याची आणि काम करण्याची तयारी असण्याची.

३. मेणबत्त्या बनवा: Business Idea

मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसाय सध्या बराच चर्चेत आहे आणि या व्यवसायाला कधीच मरण येणार नाही. मेणबात्त्यांचा वापर हा सजावटीत आणि धार्मिक कृत्यांमध्ये केला जातो. खासकरून ख्रिस्तमसच्या वेळी या व्यवसायाची मागणी वाढते. शिवाय रेस्टोरन्त (Restaurants), हॉटेल्समध्ये(Hotels) यांना मागणी असते. त्यामुळे अशा व्यवसायाला (Business Idea) कधीच रोख लागणार नाही हे नक्की.

४. डे केअर सर्व्हीसीस:

आजकालच्या जगात आई बाबा दोघेही कामात सतत व्यस्त असल्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ बाकी उरात नाही. मग ते कुठल्यातरी विश्वासू माणसाच्या शोधात असतात जे मुलांची व्यवस्थित काळजी घेतील. त्यामुळे हां व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याजवळ एक मोठी जागा असणं अगदीच गरजेचं आहे कारण लहान मुलांना खेळायला, बागडायला मोठी जागा लागते. तुमच्या घरातच अशी जागा असेल तर काही प्रश्नचं उरात नाही, पण नसेल तर सगळी तयारी 20,000 हजार रुपयांमध्ये होऊन जाते.