Business Idea : 5 लाखांपेक्षा कमी खर्चात सुरु करा ‘हे’ व्यवसाय; नंतर आयुष्यभर पैसाच पैसा

बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल वाढती महागाई पाहता प्रत्येकाने स्वावलंबी असावं. शिक्षणापासून जेवणापर्यंत साऱ्या गोष्टी महाग झाल्या आहेत. आपला दररोजचा खर्च भागवणं सुद्धा कठीण झालं आहे. नोकरी करणे अनेकजणांना परवडत नसून स्वतःचा काहीतरी व्यवसाय (Business Idea)सुरु करावा अशी सध्याच्या तरुणाईची मानसिकता झाली आहे. परंतु व्यवसाय सुरु करायचं म्हंटल तर लागतो तो म्हणजे पैसा. पैसा गुंतवल्यानंतरच तुम्हाला त्यातून आकर्षक फायद होणार आहे. प्रत्येक वेळी मोठी गुंतवणूक करूनच व्यवसाय केला जाऊ शकतो असं नाही त्यामुळे कमीत कमी पैश्यात सुद्धा व्यवसाय करता येतो. तुम्ही सुद्धा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही 5 लाखांपेक्षा कमी पैश्यात कोणकोणते व्यवसाय सुरु केले जाऊ शकतात याबाबत सांगणार आहोत.

1) Disposable Paper Plates बनवणे:

अनेक लग्ना- मुन्जींना तुम्ही पाहिलं असेल की लोकं Disposable Paper Plates चा वापर करतात. का तर ह्या वापरायला सोप्या, वर नंतर भांडी धुवत बसायचा प्रश्न नसतो. अश्या Paper Plates ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारत सरकार ने Plastic वर रोख लावल्यानंतर ह्याला मोठी मागणी येत आहे. लोकं देखील आजकाल पर्यावरणाला हानिकारक गोष्टींचा वापर करत नाही. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला मोठा फायदा मिळवून देईल.

2) Printing Business:

जर का तुम्ही एका शाळा किवा कॉलेजच्या बाहेर हा व्यवसाय सुरु केला तर नक्कीच त्यातून तुम्हाला बक्कळ पैसे कमवण्याची संधी आहे. शिक्षण घेताना मुलांना अनेकवेळा प्रिंटिंगची गरज असते आणि आपल्या घरात Printer घेण हे सगळ्यांनाच परवडणारं असत नाही. त्याच बरोबर इतर कार्यालयीन कामांसाठी प्रिंटिंगची गरज असते. त्यामुळे या व्यवसायाला कधीही मरण नाही. अशावेळी तुम्ही लहान दुकान सुरु करून त्यामध्ये हा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरु करू शकता.

3) Restaurant सुरु करा : (Business Idea)

देशात खवय्यांची काही कमी नाही. घरी कितीही चांगलं जेवण असलं तर हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची मज्जा काही औरच… त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादे स्वतःच Restaurant सुरु करू शकता. यासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा असली कि अजून मस्त ठरेल. केवळ 5 लाखांपेक्षा कमी पैश्यात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. त्यासाठी तुमच्या आजूबाजूला लोकांची आवड काय आहे हे जाणून घ्या. व त्यानुसार पदार्थ तुमच्या Restaurant मध्ये तयार ठेवा. तुमच्या व्यवसायचे Online Marketing करा व अधिकाधिक ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करा.

4) Consulting Agency:

कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी लोकं Consulting Agency ची मदत घेतात. आपण Business कसा सुरु करावा, ह्यातून फायदा होईल की नाही इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकं Consulting Agency ची मदत घेतात. जर का तुम्ही Business जाणता आणि तो इतरांना समजावून सांगू शकता. त्यांना न दिसणाऱ्या गोष्टी जर का तुम्ही दाखवून देऊ शकत असाल तर नक्कीच हा व्यवसाय सुरु करावा.

5) Catering:

लग्न असो किवा पार्टी जेवण हा फार महत्वाचा भाग असतो. असं म्हणतात पोटाकडून मनाकडे पोहोचता येत. जर का तुम्हाला खाद्यपदार्थांची आवड असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. इथे तुम्हाला Management Skillsची गरज आहे. कमीत कमी खर्चात हा व्यवसाय (Business Idea)सुरु केला जाऊ शकतो. आणि सिझनमध्ये तुम्ही अगदी कमी काळात वर्षभराची कमाई करू शकता. यासाठी महत्वाचे म्हणजे तुमच्यातील कला आणि हाताखाली विश्वासू माणसे असं आवश्यक आहे. तसेच तुम्ही जर स्वतःचे मार्केटिंग केलं तर लांबून लांबूनही तुमची मागणी वाढेल.