बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं अवघड झालंय. त्यामुळे अनेक जणांचा कल नोकरीपेक्षा बिझनेस स्टार्टअपकडे (Business Idea) वळत आहे. प्रत्येकाला छोटासा बिजनेस टाकावा असं वाटत असतं. परंतु नोकरी करून मिळणाऱ्या पैशात आपण घर खर्च अत्यंत हालाकीने पूर्ण करतो. मग अशा परिस्थितीत बिझनेस करण्यासाठी पैसा कुठून उभा करणार हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. परंतु आपल्याकडे असेही काही व्यवसाय आहेत ज्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कमी गुंतवणुकीतून सुद्धा जास्त नफा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेस आयडिया याबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
१) होम बेकरी- (Business Idea)
आज काल प्रत्येकाला बेकिंग पदार्थ ताजे बनवलेले आवडतात. बेकिंग प्रॉडक्ट आवडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जर तुम्हाला बेकिंग आयटम्स बनवता येत असेल, तर तुम्ही होम बेकरी चा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्हाला यामधून मोठा फायदा होऊ शकतो. या बिझनेस मध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज नसून जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळेल तेव्हा तुम्ही प्रोडक्ट तयार करून देऊ शकतात. यासाठी फक्त बेकिंग स्किल आणि ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रॉडक्टची आवश्यकता आहे. त्याचबरोबर तुम्ही या बिझनेससाठी (Business Idea) सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रोडक्टचा प्रचार करू शकता.
२) घरगुती मेस –
आजकल घरगुती मेसची सुद्धा मागणी वाढली आहे. खास करून शहराच्या ठिकाणी जिथे अनेक तरुण मुले नोकरीसाठी आपलं घरदार सोडून जातात त्याठिकाणी तर चांगल्या प्रकारची आणि चविष्ट चव असलेली मेस असणे अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. कारण दररोज मोठमोठ्या हॉटेल मध्ये जेवण करणं हे सुद्धा सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. अशावेळी तुम्ही मेस सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैशाची गुंतवणूक करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जर गरज पडली तर तुम्ही घरपोच डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा सुरु करू शकता, ज्यामुळे तुमचा व्यवसाय (Business Idea) आणखी वाढण्यास मदत होईल.
३) युट्युब-
आजकाल सोशल मीडिया वरून देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली जाते. जर तुम्ही कॅमेरासमोर उभे राहून फ्लूएन्ट बोलू शकला आणि तुमच्याकडे कंटेंट मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवून युट्युब वर अपलोड करू शकता. त्यामुळे तुमची बंपर कमाई होईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं यूट्यूब चैनल बनवावं लागेल. आणि त्यावर व्हिडिओ अपलोड करावा लागेल. युट्युब वर व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते युट्युब वरून सहज पैसे देखील कमावत आहेत. अशावेळी तुमच्यासाठी सुद्धा यु ट्यूबच्या (Business Idea) माध्यमातून पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.
ब्लॉग
४) ब्लॉगर –
जर तुम्ही लिखाण करण्यात माहीर असाल तर ब्लॉगिंग वरून तुमची चांगली कमाई होऊ शकते. ब्लॉगिंग करत असताना तुम्ही वेबसाईट देखील बनवू शकतात आणि या वेबसाईटच्या प्रमोशनसाठी तुमच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. ज्यामध्ये काही महिन्यांमध्ये तुमची कमाई देखील सुरू होऊ शकते. तुम्ही ज्या विषयावर ब्लॉग लिहू इच्छित आहात त्यावर तुमची पकड चांगली पाहिजे. तुमचे ब्लॉग वाचणाऱ्यांची संख्या वाढली की तुम्हाला पगार मिळू शकतो.
५) फ्रीलान्सर-
फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून काम करू शकतात. फ्रीलान्सिंग जॉब मध्ये तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये न जाता घरबसल्या पैसे कमवता येऊ शकतात. तुम्ही ग्राफिक डिझाईन, एमएस ऑफिस, कन्टेन्ट रायटिंग यासारखे काम करत असाल तर फ्रीलान्सिंग मध्ये हे जॉब उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्हाला व्हॉइस ओव्हर जॉब देखील मिळू शकतो. आणि यातून बंपर कमाई होऊ शकते.