Business Idea । चांगली आणि आलिशान लाइफ जगायची असेल तर सर्वात चांगलं आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे बिजनेस. आजकाल नोकरी करण्यापेक्षा बिझनेस स्टार्टअपमध्ये नशीब आजमावण्याचा विचार प्रत्येक जण करत आहे. जेणेकरून स्वतःचा छोटासा बिझनेस उभा राहील आणि लक्झरी लाईफ जगता येईल. परंतु त्यासाठी बऱ्याच जणांना बिझनेस नेमका कोणता करावा हा प्रश्न पडतो. यासाठी तुम्हाला आम्ही काही खास बिजनेस आयडिया देणार आहोत.
असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडे टॅलेंट असेल तर तो कधीच उपाशी राहू शकत नाही. तुम्ही तुमचं टॅलेंट आजमावून बिझनेस च्या माध्यमातून (Business Idea) पैसे कमवू शकतात आणि तुमचा छोटासा बिजनेस यामुळे सुरू होऊ शकतो. यासाठी फक्त टॅलेंट आणि पैशांची गरज आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. आपण कमी इन्वेस्टमेंट मध्ये हा बिझनेस करू शकतो. यामधून आपल्याला चांगला पगार देखील मिळेल.
1) योगा क्लासेस (Yoga Classes) –
जर तुम्हाला योगा करणे आवडत असेल आणि तुमच्यामध्ये योगा करण्याचे टॅलेंट असेल तर हे टॅलेंट तुम्ही बिझनेस मध्ये बदलू शकतात. त्यासाठी तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना योगा क्लासेस बद्दल माहिती पोहोचवू शकतात. जर तुम्ही योगामध्ये ट्रेन नसाल तर योगा इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही योगा सर्टिफिकेशन कोर्स करून सुद्धा हे योगा क्लासेस घेऊ शकतात. परंतु हा योगा सर्टिफिकेट कोर्स योगा सर्टिफिकेट बोर्डाच्या मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट मध्ये करा.आजकाल योगाचे महत्व सुद्धा लोकांना चांगले समजू शकलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकांना योगाचे ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रमाणात पैसे कमवू शकता.
2) फॅशन ट्रेडिंग बिजनेस (Fashion Trading Business)-
तुम्ही कपड्यांचे दुकान टाकून देखील बिजनेस करू शकतात. या बिझनेस साठी तुम्ही रेडीमेड कपड्यांचे, साड्यांचे, फॅन्सी ड्रेसेस चे दुकान टाकू शकतात. या बिझनेस ला सुरू करण्यासाठी तुम्हाला पैसे इन्वेस्ट करावे लागतील. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर तुम्ही सुरुवातीला छोटे दुकान टाकून देखील तूमचा बिजनेस सुरू करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही कपड्यांच्या मार्केटिंग साठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात. एवढेच नाही तर व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे बिझनेस ग्रुप तयार करून तुमच्या दुकानात असलेले फॅन्सी आणि ट्रेडिंग ड्रेसेसचे फोटोज तुम्ही ग्रुप वर टाकून ग्राहकांना हवे असलेले कपडे ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकता.
3) ड्रायव्हिंग स्कूल (Driving School) –
गाडी शिकणे हे महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे त्यामुळे आज काल प्रत्येक गल्ली, कॉलनी मध्ये ड्रायव्हिंग स्कूल्स दिसतात. त्याचप्रकारे तुम्ही देखील ड्रायव्हिंग स्कूल सुरु करून टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या शिकवू शकतात. यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी एक दुकानाची गरज असेल. त्याचबरोबर तुमच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर असणे देखील गरजेचे आहे. या बिझनेसमध्ये जास्त इन्वेस्टमेंट करावी लागेल परंतु यामधून आयुष्यभर तुम्ही मोठ्या प्रमाणात कमाई करू शकता.
4) पार्किंग (Parking)- Business Idea
सध्या रस्त्यावर गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जण नवनवीन गाडी खरेदी करत असतो. परंतु जेव्हा आपण बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गाडीच्या पार्किंगचा. मेन मार्केटमध्ये बऱ्याचदा पार्किंगची खूप मोठी समस्या उद्भवते. याचा विचार करून तुम्ही चांगल्या जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. या पार्किंग बिझनेसमुळे तुम्हाला प्रत्येक गाडीचे चाळीस-पन्नास रुपये मिळू शकतात. आणि मोठी कमाई होऊ शकते. यासाठी तुम्ही भाड्याने जागा घेऊन देखील पार्किंग सुरू करू शकतात.
5) रोपवाटिका (Nursery)–
आज काल प्रत्येकांच्या घरांच्या बालकनी, छतावर छोटी छोटी रोपे आणि झाडे लावली जातात. बऱ्याच व्यक्तींना झाडे लावण्याची, वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावण्याची प्रचंड आवड असते. त्यामुळे तुम्ही रोपवाटिका टाकून रोपे विकू शकतात. हा एक चांगला बिजनेस असून तुम्हाला यातून चांगली कमाई मिळू शकते. यासोबतच तुम्ही रोपे लावण्यासाठी कुंड्या आणि माती देखील विकू शकतात. या व्यवसायातून तुम्हाला चांगल्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे.