बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र यासाठी नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसाय सुरु करण्याची भीती वाटते, कारण व्यवसाय म्हटला की गुंतवणूक करावी लागते. एवढी गुंतवणूक केल्यानंतर व्यवसाय यशस्वी झाला नाही तर पैसे वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे अनेक वेळा मनात असून आपण व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत नाही. मात्र आज आम्ही काही अश्या बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत, जिथे जास्त पैसे न गुंतवता तुम्ही मनासारखा व्यवसाय सुरु करू शकता आणि बक्कळ पैसे कमवू शकता.
1) Youtube चॅनेल
सध्यां ऑनलाईनचा जमाना असून सगळीकडेच युट्युबची चर्चा वाढत आहे. सकाळी नाश्ता काय करावा यापासून ऑफिसला जाताना कोणते कपडे घालावेत इत्यादी सगळी माहिती इथे मिळते. शिवाय तुमच्या अभ्यासाविषयी, करिअर विषयी काही माहिती हवी असल्यास युट्युबची मदत घेता येते. इथे स्वतःचा चॅनेल सुरु करायला तुम्हाला काही गुंतवणूक करायची गरज नाही. फक्त मोबाईल किंवा लेपटोपच्या मदतीने तुम्ही कोन्टेन्ट तयार करू शकता. युट्युब वर तुम्ही तुमचे सब्स्क्रिबशन वाढवले आणि चांगल्या दर्जाचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर तुम्हाला कायमस्वरूपी पैसे मिळणे सुरु होईल.
2) भाड्याने गाडी देणे
जर का तुमचं घर एखाद्या पर्यटन स्थळाच्या जवळ असेल तर तिथे गाडी भाड्याने दिली जाऊ शकते. तसेच जर का तुम्ही रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टोपच्या जवळ राहत असाल तर तिथे सुद्धा पर्यटकांना गाडी भाड्याने देता येऊ शकते. यासाठी विशेष गाडी विकत आणण्याची गरज नाही, जी गाडी घरात असते तीच भाड्याला द्यावी. किंवा दररोज शाळकरी मुलांना शाळेत सोडून आणण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष गुंतवणूक करण्याची गरज नाही. त्यामुळे जो काही पैसा येईल तो बोनस म्हणूनच समजावा.
3) कॉम्प्युटरची कामं करून देणं– Business Idea
तुम्हाला कॅम्प्युटरची आवड आहे का? Technological गोष्टी हाताळणं तुम्हला चांगला जमतंय का? जमत असेल तर जास्ती विचार न करता या व्यवसायची सुरुवात करा. इथे तुम्ही इतरांची technical कामांमध्ये मदत करत पैसे कमवू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष पैसे गुंतवण्याची गरज नाही, कारण घर बसल्या देखील हा व्यवसाय (Business Idea) केला जाऊ शकतो. सध्या सर्वत्र कम्प्युटर – लॅपटॉपची गरज असतेच त्यामुळे या व्यवसायाला कधीही मरण नाही. फक्त तुम्हाला कॉम्पुटर आणि त्याच्या दुरुस्तीबद्दल सखोल माहिती असणं आवश्यक आहे.
4) तुमच्या कलेचा वापर करा:
आपल्या कलेचा वापर करायला काही पैश्यांची गरज नसते. तुम्ही कदाचित चित्रकलेत चांगले असाल किंवा हस्तकलेत तुमची आवड असेल. विणकाम, शिवणकाम, टाकाऊ मधून टिकाऊ अश्या एक न अनेक कला आहेत. घरी बनवलेल्या गोष्टींची विक्री करता येते, संगीत किंवा नृत्याचे ऑनलाईन क्लास घेता येतात. इथे काहीच गुंतवणूक करता तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.