Business Ideas : गणेशोत्सवात सुरु करा ‘हे’ सोपे व्यवसाय; होईल भरपूर कमाई

बिझनेसनामा ऑनलाईन । येत्या काही दिवसांतच आपण गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत. चतुर्थी म्हटली की आपला उत्साह अगदी शिगेला जाऊन पोहोचतो. तुम्हाला माहिती आहे का या चतुर्थीत तुम्ही नवीन व्यवसाय( Business Ideas) सुद्धा सुरु करू शकता. भारतात विशेषता महाराष्ट्र आणि गोव्यात हा उत्सव मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरा केला जातो. तर असा कोणता व्यवसाय आहे जो तुम्हाला यंदाच्या चतुर्थीत आर्थिक फायदा करून देईल, जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख नक्की वाचा. येत्या मंगळवारी म्हणजेच 19 सप्टेंबर 2023 रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा लाडका उत्सव साजरा करण्यात येईल. या दरम्यान तुम्ही पूजेसाठी लागणारं साहित्य, सजावटीसाठी लागणारया गोष्टी, गणपती बाप्पाची मूर्ती,इत्यादी गोष्टींचा व्यवसाय सुरु करू शकता.

१) पूजेच्या सामानाचा व्यवसाय:

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी कलश, रांगोळी, लाल फुलं, दुर्वा, अगरबत्ती, धूप, तूप, कपूर इत्यादी अनेक गोष्टींची गरज असते. जर का या संधीचा फायदा घेत तुम्हाला जर का एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे तर नक्कीच याचा विचार केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांसह हा छोटासा व्यवसाय (Business Ideas) सुरु करू शकता.

२) गणपती बाप्पाच्या मूर्तींचा व्यवसाय: Business Ideas

तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तींचा व्यवसाय सुरु करू शकता. Plaster Of Paris चा वापर आत्ता एवढा वाढला आहे, ज्यामुळे शाडू मातीची मूर्ती बाजारत मिळणं मुश्कील बनलं आहे. शाडू मातीच्या मूर्तींची किंमत अधिक असल्यामुळे कदाचित लोकं POP विकत घेणं सोयीस्कर समजतात. तुम्ही एखाद्या मुर्तीकाराकडून मुर्त्या विकत घेत हा व्यवसाय सुरु करू शकता.

३) चतुर्थीच्या सजावटीचे समान विकणे:

चतुर्थी म्हटलं की सजावट हि प्रमुख आहे. इतरांपेक्षा आपली सजावट वेगळी व आकर्षक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही विविध lights, फुलांच्या माळा, रांगोळीचे सामान अश्या एक न अनेक वस्तूंचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय (Business Ideas) नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा करून देणारा ठरेल.