Business Ideas For Women : महिलांनो, आता घरबसल्या पैसे कमवण्याची संधी; हे 3 व्यवसाय तुम्हाला करतील मालामाल

बिझनेसनामा ऑनलाईन । जगभरात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे, आपल्या देशात अजून काही महिला अश्या आहेत ज्या पूर्ण वेळ घरची जबाबदारी सांभाळतात. काहीच्या घरातील लोकांचे विचार मागासलेले असल्यामुळे त्या बाहेर पडून नोकरी करून स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकत नाही. तरीही काही काम करून घरखर्चाला हातभार लावावा अशी अनेक जणींची इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायायाबाबत सांगणार आहोत. ज्या कोणत्याही महिला घरबसल्या करु शकतात आणि बक्कळ पैसे कमावू शकता.

१) फेशन डिझायनिंग (Fashion Designing) :

अनेक महिलांना शिवणकला जमते आणि आवडते सुद्धा. घरबसल्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्या शिवत असतात. ज्यात कधी लहान मुलांचे कपडे,टोपरी,दुपटी शिवत असतात. आणि जरी कडे शिवता आले नाही तरीही काहीजणी कपडे डिझाईन (Business Ideas for Women) नक्कीच करू शकतात. तर जर का शिवणकाम किंवा डीझायनिंग तुमची आवड असेल तर नक्कीच तुम्ही त्याचे परिवर्तन व्यवसायात करू शकतात. यासाठी तुम्हाला कुठल्या विशेष मोठ्या जागेची गरज नाही घरच्या अंगणात किंवा छोट्या एका खोलीत हा व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. याची सुरुवात नातेवाईक व मित्रापारीवाराकडून करावी. सोबतच तुम्ही सोशल मिडियाचा वापर करू शकता.

२) डे केअर सर्विसिस ( Day Care Services): Business Ideas for Women

डे केअर सर्विसिस म्हणजे काय तर पाळणाघर. या गजबजलेल्या जगात लहान मुलांना मागे सोडून कामावर जाणं अनेक आई वडिलांना जमत नाही. अश्यावेळी आपल्या लहान मुलाची योग्य काळजी घेणाऱ्या एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या ते शोधात असतात. महिला मायेने आणि आवश्यक काळजी घेणाऱ्या पाळनाघारांनां प्राधान्य देतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. घरात मोकळी जागा असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. महिलांमध्ये मुळातच वात्सल्याचा गुण असतो. त्यामुळे या व्यवसायाचा नक्कीच विचार करावा.

३) मुलांसाठी छंदवर्ग (Workshop For Kids) :

तुमच्या जवळ जर का काही कला कौशल्य आहे व सोबतच लहान मुलांची आवड असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही छंदवर्ग सुरु करू शकता. हा एक चांगला व फायदेशीर व्यवसाय आहे. अनेकांचे पालक कामात दिवसभर गुंतलेले असतात, ज्यामुळे मुलांसोबात वेळ घालवत त्यांच्या कला कुसरी जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही . पण कुणीतरी आपल्या मुलांच्या इच्छा समजून त्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांची इच्छा असते. या परिस्थितीत तुम्हाला जर का काही कला अवगत असतील जसे कि चित्रकला, हस्तकला, गायन, नृत्य , संगीत तर नक्कीच तुम्ही ती पुढ्या पिढी पर्यंत पोहचवू शकता. यामुळे एकार्थी आपली संस्कृती जपली जाते. शिवाय दिवसभरात कोणत्याही सोयीच्या वेळी तुम्ही हा वर्ग घेऊ शकता.