Business Idea :वाढती महागाई बघता हातात पुरेसे पैसे असणं महत्वाचं असत. मग ती नोकरी असो वा व्यवसाय पण हातात पैसे असावेत. तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा आहे का? पण शिक्षणाच्या अभावी किंवा पैश्यांच्या अभावी तुम्ही मागे वळताय का? तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशी एक कल्पना देणार आहोत जी नक्कीच तुमची हे प्रश्न सोडवतील. या व्यवसायांसाठी तुम्हाला शहरात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. गावातच कमीत कमीत पैश्यात हे व्यवसाय सुरु केले जाऊ शकतात. नेमक्या कोणत्या व्यवसायांबदल आम्ही बोलतोय हे जाणून घेऊया.
१) मधमाश्या पाळणे:
मधाचा वापर स्वयंपाक घरात नेहमीच केला जातो, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो. मधाची बाजारातील मागणी कधीही कमी होणार नाही. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. गावात हा व्यवसाय अगदी सोप्या प्रकारे करता येतो, काही संस्था अश्याही आहेत ज्या मधमाश्यांचे पालन करण्यासाठी तुम्हाला सर्व गरजेच्या गोष्टी स्वताहून पुरवतात.
२) बकरी पालन: Business Ideas
बकऱ्या पाळणे हा आपला जुना व्यवसाय (Business Ideas) आहे. आपल्या गावांमध्ये काही वर्षांपूर्वी हा व्यवसाय केला जायचा. मात्र हळू हळू शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी लोकांची पावलं शहराकडे वळली. अनेकांच्या घरात हा पारिवारिक व्यवसाय म्हणून संभाळला जायचा. आणि पुन्हा एकदा आपण याचा व्यवसाय म्हणून विचार करू शकतो. तुम्हाला या व्यवसायातून नेमका कसा फायदा होतो हे जाणून तो वाढवावा, म्हणून सुरुवात हि कधीही कमी स्केलवरच असावी(Business Idea).
३) गांडूळ खत:
आपल्या आजूबाजूला तुम्ही अनेक लोकं पहिली असतील ज्यांना बागेची आवड असते. विविध रंगांच्या फुलांनी ती आपली बाग सजवत असतात. बाजारात केमिकल फार्टीलयीझर्स उपलब्ध असतात मात्र ते रोपांच्या वाढीसाठी त्यांचा अतिरेक चांगला नाही. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करत काही लोकं केमिकल्सचा वापर करण टाळतात. याच परिस्थितीचा तुम्ही स्वतःच्या बाजूने फायदा करून घेत व्यवसाय करावा. गांडूळ खात हे रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे आणि अनेक लोकं त्याची निवड करतात.
४) चहाचे दुकान:
चहा न आवडणारी मंडळी फारच कमी आहेत. प्रवासाला निघालेली माणसं किंवा काम करून थकलेली लोकं सगळ्याचं ताजं तवानं करण्याचं काम चहा करत असतो. चहा आणि बिस्कीट म्हटलं कि घरातली संध्याकाळ आठवते. त्यामुळे गावात तुम्ही चहाचं छोटंसं दुकान टाकू शकता. चहा सोबत काही बिस्कीट किंवा वडापाव सारख्या गोष्टी ठेवल्यात तर नक्कीच तुमचा खप वाढेल.
५) पिठाची गिरणी:
पोळ्या आणि भाकऱ्या या प्रत्येक मराठी कुटुंबाचा अविभाज्य बाग आहे. यांच्याशिवाय आपलं जेवण पूर्णचं होत नाही. शिवाय नाश्ना, जोंधळा यांसारख्या पिठांचा वापर स्वयंपाकघरात केला जातो. शहरातून पीठ घेऊन येणं जरा महाग काम आहे, घराजवळच जर का हि सोय उपलब्ध झाली तर अनेक गृहिणींच्या समस्या दूर होतील, त्यामुळे या व्यवसायाचा (Business Ideas) नक्कीच विचार केला जाऊ शकतो. .