Business Ideas: आपल्यापैकी अनेक जणांची अशी इच्छा असते कि आपल्याजवळ व्यवसायाच्या रूपात एक्स्ट्रा इन्कम सोर्स असावा. आणि या वाढत्या महागाईच्या काळात असा विचार मनात येणं अगदीच स्वाभाविक आहे. तुम्हाला जर का कामाची आवड असेल आणि सतत काम करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कला कौशल्यांचा वापर करून स्वतःसाठी आणि परिवारासाठी नोकरी व्यतिरिक्त पैसे मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही आयडियास देणार आहोत ज्यांचा वापर करून हे स्वप्न तुम्ही साकार करू शकता..
१) मोबाईल फूड व्हॅन :
फूड व्हॅन म्हणजे काय तर घरी काही खाण्याचे पदार्थ बनवून त्यंची विक्री करणे होय. आजकाल तरुण पिढीला संध्याकाळी किंवा रात्री मित्र- मैत्रिणींसोबत बाहेर जाऊन वेळ घालवायला आवडतो. अश्यावेळी तुमचा व्यवसाय त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हि गाडी असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी हिची चांगलीच मदत होऊ शकते आणि बिजनेस सुरु करण्यासाठी जास्ती खर्चही येणार नाही केवळ 25 ते 30 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय आरामात सुरु करता येतो.
२) डान्स किंवा गाण्याचे क्लास: Business Ideas
तुम्ही अजूनही तुमची कला जोपासून आहात का? हो तर याचंच परिवर्तन अगदी सोप्या पद्धतीने व्यवसायात होऊ शकतं. माणसाची कला हि कधीच त्याला एकट सोडत नाही असं म्हणतात, त्यामुळे फावल्या वेळात पैसे कमावण्यासाठी तसेच मानसिक समाधान मिळवण्यासाठी तुम्ही अश्या एका व्यवसायाचा विचार करू शकता. घरच्या घरात आजू बाजूच्या मुलांना तुम्ही डान्स किंवा संगीताचे धडे देऊ शकता किंवा या डिजिटल जगात ऑनलाईन क्लास घेणं अगदीच सोपं आहे.
३) ज्यूस सेंटर:
आजकाल वातावरणाबद्दल कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. दिवसेंदिवस आजुबाजूचं तापमान वाढत आहे. लोकांनाही शारीरिक स्वास्थ्याबद्दल गोडी निर्माण झाली आहे, त्यामुळे ते फळांच्या ज्यूसला कोणत्याही कोल्ड ड्रिंक पेक्षा जास्ती प्राधान्य देतात. तुम्ही काही ठराविक फळांचा वापर करून ज्यूस सेंटरची सुरुवात करू शकता, आणि हळूहळू व्यवसायात जोर आला कि तो वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे जर का तुम्ही फावल्या वेळात एक्स्ट्रा इन्कम बद्दल विचारात करत असाल तर हा व्यवसाय (Business Ideas) एक चांगला पर्याय ठरू शकतो.