Business Ideas: काही माणसांना कुणाच्या हाताखाली काम न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. व्यवसाय सुरू करण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे, त्यातून मिळणारे पैसे… सर्वसामान्यतः व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे कोणत्याही नोकरीच्या पगारापेक्षा अधिक समजले जाते, म्हणूनच दिवसेंदिवस व्यवसायाकडे तरुणांचा कल वळताना दिसतो. या महागाईच्या काळात आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू नये म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि अलीकडे यात नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य दिलं जात आहे. तुम्ही देखील नऊ ते पाच अशा रुटीन लाईफला कंटाळला आहात का? स्वतः मालक होऊन व्यवसायाची सुरुवात करायची आहे का? हो तर आज आम्ही तुम्हाला व्यवसायाच्या काही खास कल्पना सुचवणार आहोत…
अनेक वेळा काय होतं की आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा यावर प्रश्नचिन्हच असतं. सरकारकडून तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पोहोचवली जाते याशिवाय वेगवेगळ्या बँका देखील तुम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी तत्पर असतात केवळ तुम्हाला अशा योजनांची माहिती असली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करू शकता.
१) मोबाईल रिपेरिंग:
तुम्हाला जर का मशीनची आवड असेल तर मोबाईल रिपेरिंग हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. आजच्या घडीला मोबाईल वापरत नाही अशी एखादी व्यक्ती क्वचितच असेल. कित्तीतरी कामं आज घरबसल्या मोबाईलच्या बटनांद्वारे केली जातात, त्यामुळे बिघडलेला एक मोबाईल माणसासाठी कष्टकरी बनू शकतो. हे युग स्मार्टफोनचे युग म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आणि म्हणूनच मोबाईल रिपेअर करणाऱ्या म्हणजेच मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या माणसांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
२) ब्लॉग तयार करा: Business Ideas
लिखाणाची आवड असलेल्या प्रत्येक माणसाला काही पत्रकार किंवा लेखक होण्याची गरज नाही. घरबसल्या छंद तुम्ही जोपासू शकता. ज्या विषयाबद्दल तुम्हाला सर्वाधिक रुची आहे किंवा माहिती आहे अशा विषयावर दरदिवशी किंवा चार-पाच दिवसातून एकदा लेखन केलं जाऊ शकतं. आजकाल ब्लोगर म्हणून काम करणारी मंडळी महिन्याला लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. या घडीला इंटरनेट हा माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणावा लागतो, कारण याच इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही जगभरातील मोठमोठ्या वेबसाईटसाठी सुद्धा लेखन करू शकता. मात्र सुरुवातीला स्वतःची एक वेबसाईट सुरू करून किंवा एखाद्या सोशल मीडिया अकाउंट वरून लेखनाची छोटीशी सुरुवात केली जाऊ शकते (Business Ideas).
३) मुलांना शिकवणी द्या:
धावपळीच्या ह्या काळात अनेक आई-वडील मुलांचा अभ्यास कसा होईल या चिंतेने त्रस्त आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक दिवस कामात गुंतलेल्या पालकांना विशेष सवड काढून मुलांचा अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे ते एका भरवशाच्या शिक्षकाच्या शोधात असतात. जर का तुम्हाला मुलांना शिकवायची आवड असेल, तसेच एखाद्या विषयात तुम्ही प्राविण्य मिळवलेलं असेल तर नक्कीच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शिकवणी घेऊ शकता. यासाठी कुठल्या शाळेत जाऊन नोकरी करण्याची गरज नाही . घरबसल्या आजकाल ऑनलाईन पद्धतीने देखील शिकवण्या दिल्या जाऊ शकतात. जसजशी तुमची लोकप्रियता वाढत जाईल तसतशी यातून चांगली कमाई (Business Ideas) केली जाऊ शकते.
४) अनुवादक बना:
भाषेची आवड असलेल्या माणसाला कधीच बेरोजगारीचा सामना करावा लागत नाही. एखादी भारतीय भाषा आणि परदेशी भाषा जर का तुम्ही शिकलात तर अनुवादक म्हणून तुमची निवड सहजपणे केली जाईल. देशात अनेक ठिकाणी हिंदी टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश अशा प्रकारे भाषांतर करू शकणाऱ्या माणसांची गरज वाढत आहे, त्यामुळे जर का तुम्हाला भाषेप्रती आवड असेल तर नक्कीच या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवली जाऊ शकते.