Business Ideas: नवीन वर्षात सुरु करा ‘हे’ व्यवसाय; घर बसल्या कराल मोठी कमाई

Business Ideas : नवीन वर्षाची सुरुवात स्वतःचा व्यवसाय सुरु करून करायची आहे का? हो, तर आता जास्ती वेळ न दवडता हि बातमी शेवटपर्यंत वाचाच कारण इथे आम्ही तुम्हाला कमीत कमी वेळात आणि खर्च न वाढवता सुरु करता येणाऱ्या व्यवसायांबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही एखादी नोकरी जरी करत असलात तरीही राहिलेल्या वेळात नक्कीच या व्यवसायांचा विचार केला जाऊ शकतो. कारण हे व्यवसाय तुम्हाला तुमच्या कला आणि कौशल्यांना चालना देण्यात मदत करतील. म्हणून रोजच्या कामाला कंटाळला असल्यास वेळ घालवण्यासाठी आणि मन रमवण्यासाठी हे व्यवसाय सुरु केले जाऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातून तुमची एक्सट्रा कमाई देखील होईल. कायम लक्ष्यात ठेवा कि आपण करत असलेल्या कामावर प्रेम करता आलं पाहिजे, त्यात रुची असली पाहिजे तरच त्यातून सकारात्मक निर्मिती होऊ शकते आणि प्रत्येक काम काही पैसे कमावण्यासाठी करायला पाहिजे असं नाही तर मन रमावण्यासाठी देखील काही व्यवसायांची निवड केली जाऊ शकते.

१) लॅपटॉप, कम्प्युटर दुरुस्त करा:

आजकाल अनेक लोकं घर बसल्या काम करतात, त्याला Work From Home असं म्हटलं जातं. आणि अश्यावेळी त्यांचा अधिकतर वेळ लॅपटॉप किंवा कम्युटर समोर निघून जातो. सर्वच महत्वाची कामं लॅपटॉपमध्ये अडकून पडल्यामुळे या तंत्रामध्ये आलेला जरासा बिघाड त्यांचं पूर्ण चक्र बिघडवून टाकू शकतो. तुम्हाला जर का टेक्निकल गोष्टींची आवड असेल तर तुम्ही लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या आवश्यक वस्तू दुरुस्त करून देण्याचा व्यवसाय सुरु करू शकता.

२) ब्लॉग लिहा: Business Ideas

लिखाण आणि वाचनाची आवड असलेल्या माणसाला मिळणार डिमांड कधीही कमी होणार नाही. कारण आजच्या वेगाने पळणाऱ्या या जगात आजूबाजूला चाललेल्या घटनांची थोडक्यात पण महत्वाची माहिती देणारा एखादा माणूस असेल तर त्याची वाहवा कोण करणार नाही? तुम्हाला ज्या क्षेत्राबद्दल जास्ती आवड आहे त्याबद्दल लिहायला घ्या. मग तो विषय ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप पासून थेट इतिहास आणि चर्चित घडामोडींपैकी काहीही असू शकतो. तुमच्या लिखाणाचं कौशल्य घर बसल्या तुम्हाला लाखो रुपयांची कमाई करवून देईल .

३) युट्युब चॅनल सुरु करा:

लिखाणाशिवाय तुम्हाला अभिनयाची आवड असेल किंवा तुमची बोलायची पद्धत इतरांपेक्षा जास्ती चांगली असेल तर एखादं युट्युबचं चॅनल सुरु करता येतं. या चॅनलवर तुमच्या आवडीनुसार व्हिडियो बनवा. लोकांना काय ऐकायला, पाहायला आवडेल याचा अभ्यास करा, तुमच्या कन्टेन्टमधून समाजाला काही फायदा होईल याची काळजी घ्या. कारण सोशल मीडियाच्या या जगात अनेक चॅनल्सवर एका विषयावर विविध व्हिडियोज उपलब्ध असतात, त्यामुळे तुमची विशेष शैली यातुन सादर करता आली पाहिजे याचे भान ठेवा.

४) हॅन्ड मेड वस्तू तयार करा:

शाळेत असताना आपण टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू तयार करायचो, आज त्याच प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक एका नवीन वस्तूवर खर्च करतील एवढेच पैसे खर्च करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आवडणाऱ्या, निसर्गाला हानिकारक न ठरणाऱ्या वस्तू जर का तुम्ही बनवू शकलात तर संपूर्ण बाजार तुमच्यासाठी खुला होईल. या जगात कला आणि कौशल्य जपणाऱ्या माणसाजवळ पदवी मिळवलेल्या माणसाएवढाच पैसा कमावण्याची ताकद असते हे लक्ष्यात ठेवा.

५) होम कॅंटीन:

किती तरी तरुण मंडळी शिक्षण आणि नोकरीच्या शोधात घरापासून दूर राहतात. त्यांना जर का तुम्ही घरच्या जेवणाची चव परवडणाऱ्या खर्चात मिळवून देऊ शकलात तर याशिवाय दुसरा यशस्वी व्यवसाय ठरूच शकत नाही (Business Ideas). अधिकवेळा घरची बाई हि कामासाठी बाहेर पडत असल्याने तिला जेवण करून जाणं शक्य होत नाही आणि मग त्या अश्या प्रकारच्या टिफिन सर्व्हिसिस शोधून पाहतात. तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर अगदी घरबसल्या करता येणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे.