Business Inspiration : बॉलिवूड ‘हे’ सेलेब्रिटी चित्रपटांपेक्षा ‘या’ व्यवसायांमधून कमवतात अधिक पैसे; जाणून घ्या कोणाचा काय व्यवसाय आहे?

बिझनेसनामा ऑनलाईन । बॉलीवूड म्हंटले तर लगेचच प्रसिद्धी, अफाट पैसे व एशोआरामाचे जीवन जगणारे कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात. बॉलीवूड चे हे कलाकार एका सिनेमा मध्ये काम करण्यासाठी करोडो रुपये चार्ज करतात. काही सूत्रांनुसार एक सेलेब्रिटी दर वर्षी जवळपास ३०० ते ५०० करोडोंची कमाई करतो. काही अभिनेते – अभिनेत्रींचे मिलिअन मध्ये नेट वर्थ आहे. (Business Inspiration)

पण फक्त अभिनयावर अवलंबून राहून एवढं नेट वर्थ मेंटेन करणे अवघड आहे. तसेच अभिनयाचं क्षेत्र स्थिर नाही, कधी चित्रपटात काम मिळत तर कधी काही महिने कामच नसतात. चांगला अभिनय केला म्हणून सिनेमा गाजून चांगली कमाई होईल याची गॅरेंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे बरेच कलाकार नवीन स्टार्टअप्स मध्ये किंवा वेगवेगळ्या कंपमान्यांमध्ये इन्वेस्टमेन्ट करतात. आज आपण अशाच टॉप ३ सेलिब्रिटींबाबत माहिती घेणार आहोत जे अभिनयासोबतच एक यशस्वी उद्योजकसुद्धा आहेत.

शाहरुख खान

शाहरुख खान (Shahrukh Khan) हा अभिनयापुरता मर्यादित नसून एक उत्तम बिजनेसमन ही आहे. जगभरातील श्रीमंत अभिनेते या फोर्ब्सच्या यादीमध्ये त्याचे नाव आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते. त्याने जगभरातील T20 लीग क्रिकेटमध्ये गुंतवणूक केलेली असून तो इंडियन प्रीमियर लीग मधील कोलकाता नाइट रायडर्स टीम चा मालक आहे. तसेच त्याने रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे एक प्रोडक्शन हाऊस ही स्थापन केले आहे ज्याने लोकांना अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

सलमान खान

बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) सुद्धा या रेस मध्ये मागे नाही. त्याचा सलमान खान फिल्म्स नावाचा प्रोडक्शन हाऊस असून कपिल शर्मा शो सारखे प्रसिद्ध टी.व्ही शो तसेच अनेक हिट सिनेमा या प्रोडक्शन हाऊसने दिलेले आहेत. तसेच तो लोकप्रिय ब्रँड बिंग ह्यूमन चा मालक आहे. फॅशन अक्सेसरीज व पोशाखांची विक्री या ब्रँड मधून केली जाते. ही फक्त फॅशन कंपनी नसून गरजू लोकांना मदत करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. कारण यातील बरीच कमाई वंचित मुलांना आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वापरली जाते. सलमान खान हा यात्रा डॉट कॉम चा ५% शेयर होल्डर सुद्धा आहे.

प्रियांका चोप्रा

देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चे बिजनेस फक्त देसी नसून विदेसी पण आहेत. तिचे न्यू यॉर्क मध्ये सोना नावाचे इंडियन फूड रेस्टोरंट आहे. ती पर्पल पेबल पिक्चर्स नावाचा प्रोडक्शन हाऊस ची मालकीण आहे. प्रियांका ने अनोमली हेयर केयर ब्रँड सुद्धा लॉन्च केले आहे. त्याचे बरेच कस्टमर यु एस चे आहेत, तसेच ति बंपल डेटिंग ऍप ची शेयर होल्डर आहे.