Business Inspiring Stories : शून्यातून सुरु केलेले ‘हे’ व्यवसाय फक्त मेहनत आणि जिद्दीमुळे झाले यशस्वी

Business Inspiring Stories :एखादा माणूस कधी यशस्वी होतो? जेव्हा तो भरपूर मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवतो तेव्हाच. आपल्या देशात अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत. कोणी अश्याच छोट्याश्या व्यवसायातून सुरुवात करत आज विश्व उभं केलं आहे. या सर्व भल्या मोठ्या नावांमध्ये सामील असलेल्या लोकांनी वाईट दिवसांना सामोरे जात नंतरच सुखाचा अनुभव घेतला. यात धीरूभाई अंबानी, जम्शेती टाटा अशी नावं सामील आहेत, त्यांच्या प्रयत्नांनी केवळ त्यांचा व्यवसायच नाही तर पूर्ण देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणली.अश्या काही यशस्वी व्यावसायिकांच्या गोष्टी पाहूयात आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया…

१) रितेश अगरवाल (Ritesh Agarwal)-OYO Rooms:

लहानपणापासून मुसाफिर असलेल्या रितेश यांना कधीच हॉटेल्सची सोय आवडली नाही. आणि याच त्यांच्या अनुभवाने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा दिली. तुम्हाला माहिती आहे का रितेश यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात वयाच्या फक्त 20 व्या वर्षी केली होती. मात्र प्रयत्न करणाऱ्या माणसाला यश लगेच साथ देत नाही, तसेच रितेश यांचा व्यवसाय सुरु करण्यामागे भरपूर मोठा संघर्ष आहे. पण मनात असलेली इच्छा एवढी दृढ होती कि सगळ्या संकटांवर मात करत त्यांनी वर्ष 2013 मध्ये OYO रूम्सची सुरुवात केली. आणि आज त्यांचे नाव यशस्वी व्यावसायिकांमध्ये पाहायला मिळते (Business Inspiring Stories).

२) बेनी बन्सल आणि सचिन बन्सल (Flipkart)- Business Inspiring Stories

आज सगळीकडे ओळखली जाणारी हि online shopping कंपनी कधीकाळी एका घरात सुरु करण्यात आली होती. या दोघांनी स्वतःचे पैसे खर्च करून व्यवसायाची सुरुवात केली. भारतात इंटरनेटचा वापर करून लोकांना विविध गोष्टींची खरेदी करता यावी म्हणून हा व्यवसाय सुरु केला होता. त्याकाळात इंटरनेट एवढा वापरात नव्हता, इंटरनेटचा वापर करून गोष्टींची खरेदी करता येते यांवर लोकांचा विश्वास नव्हता. तरीही लोकांची मनधरणी करत आणि विश्वास संपादन करत वर्ष 2007 मध्ये Flipart ची सुरुवात झाली.

३) विनिता सिंघ (Veenita Singh)- Sugar Cosmetics

IIT मद्रास इथून एलेक्ट्रीकल इंजिनियरिंग केल्यानंतर विनिता यांनी IIM अहमदाबाद येथून MBAची पदवी मिळवली. पण नेहमीच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच वयाच्या 23व्या वर्षी त्या या क्षेत्रात उतरल्या तरीही कष्टांनी काही त्यांची पाठ सोडली नाही किंवा विनिता परिस्थिती समोर झुकल्या नाहीत. शेवटी एप्रिल 2012 फेब-बब (FebBub) या सौदर्य प्रसाधन कंपनीकडून त्यांना आपलं नशीब अजमवायची पहिली संधी मिळाली. आणि आज शुगर कॉस्मेटिक्स (Sugar Cosmetics) हा त्यांचा व्यवसाय सातत्याने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे (Business Inspiring Stories).

४) भविष अगरवाल( Bhawish Agarwal)- Ola Cabs

शहरात प्रवास कारण आता सोपं झालाय तो म्हणजे Ola च्या सुविधांमुळे. इथे दुचाकी (Two Wheeler) ते चार चाकी(Four Wheeler) अश्या दोन्ही साधनांचा वापर करून प्रवासी प्रवास करू शकतात. किमतीबद्दल आपल्याला अनेक वेळा अंदाज नसतो आणि सांगेल ती रक्कम भरण भाग बनत, त्यामुळे Ola चा वापर हा अनेक प्रवाश्यांसाठी सोयीस्कर झाला आहे. तसेच प्रत्येकवेळी स्वतःची गाडी घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही. वर्ष 2010 मध्ये अगरवाल यांनी देशात पहिल्यांदा अशी Online Car Services ची सुरुवात केली होती.

५) फाल्गुनी नायर (Falguni Nayar)-Nayka

वयाच्या 50व्या वर्षी कोटक महिंद्रा ची नोकरी सोडून फाल्गुनी नायर यांनी व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. 20 वर्ष काम केल्यानंतर एका नव्याकोऱ्या व्यवसायाची सुरुवात कारण हि काही सोपी गोष्ट नाही. सौदर्य आणि ते खुलवण्यासाठी वापरणारे प्रोडक्ट्स यांची भारतात कमी आहे यांची त्यांना जाणीव झाली आणि वर्ष 2015 मध्ये त्यांनी Nayka ची सुरुवात केली. आज Naykaअनेक कलाकारांसोबत काम करतो आणि या व्यवसायाने स्वतःची एक ओळख बनवली आहे.