Business Strategy Tips in Marathi : तुम्ही निरीक्षण केलात तर तुमच्या लक्षात येईल कि काही कंपन्या भरपूर यशस्वी होतात, दिवसेंदिवस नफा (Profit Making) मिळवतात पण काही कंपन्या कितीही प्रयत्न केला तरीही यशस्वी (Success in Business) होत नाहीत. काही कंपन्या अश्या असतात ज्यांच्याशी कधीच तुलना केली जाऊ शकत नाही. असं कारण यशस्वी होणाऱ्या कंपन्या आपल्या कामाची आखणी करत असतात. हि आखणी कशी करावी आणि का करावी हे आज जाणून घेऊया..
कामाची आखणी(Business Strategy) म्हणजे काय?
आपल्या कंपनीचे ध्येय काय आहे हे निश्चित करणे हा सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा असतो. एकदाका तुमचं ध्येय ठरलं कि तिथेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरवता येतो आणि यालाच आखणी असं म्हणतात. कंपनीचं ध्येय काय आहे, कंपनीची सुरुवात का केली जात आहे, कोणत्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री तुम्ही करणार आहात, तुमचे ग्राहक कोण असणार आहेत आणि सहजीक अडथळे कोणते असू शकतात याची आखणी करण म्हणजेच कामाची आखणी होय. कामाची आखणी केल्यामुळे आपण नेमकं कुठे आहोत आणि कुठेपर्यंत प्रवास करायचा आहे याचा अंदाज येतो. कामाची आखणी करताना कंपनीचा उदेश काय आहे हे लक्षात घेणं महत्वाचं असत.
कामाची आखणी कशी करावी?
१. आपले ध्येय निश्चित करा: जास्ती काळासाठी चालणारा असा एक प्लेन तयार करा. तुमचे ग्राहक ओळखा, बाराजारातील परस्थिती ओळखा आणि येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून कामाची आखणी करा. येऊ शकणाऱ्या अडथल्यांवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.
२. येणाऱ्या काळातल्या संधी ओळखा: काही दिवसांत येऊ शकणाऱ्या संधींचा अंदाज घ्या. तुमच्या व्यवसायाला त्यामधून कसा फायदा होऊ शकतो याचा विचार करा. कोणताही निर्णय घेण्याआधी काही लोकांशी संवाद साधा, डेटा मिळवा आणि त्यानंतरच निर्णय घ्या.
३. नाविण्यावर लक्ष द्या: बाजारात एका सारख्या गोष्टी विकणारी अनेक माणसं असतात, जे तुमच्यासाठी प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यापेक्षा वरचढ ठरण्यासाठी कोणते बदल करता येतील यांचा अंदाज घ्या. तुमच्या उत्पादनाला इतरांपेक्षा वेगळं बनवून ग्राहक वर्गाची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा.
४. अडथळे ओळखा: तुम्ही जी काही आखणी कराल त्यामुळे येणारे आणि आलेले अडथळे दूर झाले पाहिजेत. या स्पर्धात्मक जगात कायम राहण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी आलेले अडथळे दूर करणे होय. यासाठी बाजारी परिस्थितीचा योग्य अभ्यास करता आला पाहिजे. तुम्ही काही निर्णय घेण्याआधी तो नीट तपासून पहा(Business Strategy) .