Business Success Story : अमेरिकेतली नोकरी सोडली, पद्मश्री पुरस्कार स्वीकारला नाही; जाणून घ्या भारतातील ‘निस्वार्थी’ उद्योजकाची कहाणी

Business Success Story : क्षेत्र कुठलंही असलं तरी कष्टांशिवाय कुणालाही फळ मिळालेलं नाही, मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय. एखाद वेळेस कष्ट करून सुद्धा तुम्हाला म्हणेल तसं यश प्राप्त होणार नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये जो खचून न जाता कायम आपल्या ध्येयाप्रती कार्यरत राहतो, तोच एक ना एक दिवस नक्की यशाचं शिखर गाठतो. आतापर्यंत आपण अनेक व्यावसायिकांच्या गोष्टी उलगडून पाहिल्या, प्रत्येकाचे ध्येय आणि प्रवास जरी वेगवेगळे असले तरीही सर्वांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या मेहनतीमुळेच त्यांना आज सुखी आणि समाधानकारक आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तुम्हाला भारतातील अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने थेट अमेरिकेची नोकरी सोडून भारतातील एका खेडेगावात करोडोंची कंपनी उभारून दाखवली आहे.

अमेरिकेतून परत येत गावात उभा केला व्यवसाय : (Business Success Story)

आजूबाजूला तुम्ही पाहिलंच असेल की गावातली मंडळी ही शहराकडे वळतात ती रोजगाराच्या संधीसाठी. त्यानंतर भारतात पुरेसा संधी उपलब्ध नसल्याचे कारण देत, नशीब आजमावून पाहण्यासाठी हीच मंडळी परदेशात प्रस्थान करतात. मात्र आजच्या गोष्टीतला हा माणूस अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात परत आला आहे, एवढेच नाही तर परत आल्यानंतर भारतातील एका खेडेगावामध्ये त्याने कंपनी उभारून दाखवली आहे. बहुतेक लोकं भरपूर पैसा कमावण्यासाठी ज्या काळात परदेशात जातात त्याच घडीला या माणसाने मायदेशात परत येऊन यश संपादन करून दाखवलं आहे. श्रीधर वेम्बू असे त्यांचं नाव आहे.

कोण आहे हा फॉरेन रिटर्न?

श्रीधर वेम्बू या भारतातील एका रहिवाशाने अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि इथल्या एका छोट्या गावात आपली कंपनी सुरू केली. कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही कंपनी 8000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. अत्यंत मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या श्रीधर वेम्बू यांनी तमिळनाडू मधून तमिळ भाषेतच आपला प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर वर्ष 1989 मध्ये त्यांनी आयआयटी (IIT) मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. पुढे पीएचडी (PhD) करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या श्रीधर वेम्बू यांना अमेरिकेतच नोकरी मिळाली.

आज कालच्या जगात अमेरिकेसारख्या देशात मिळालेली नोकरी सोडून भारतात परत येण्याचा विचार क्वचितच कोणी करेल. मात्र श्रीधर वेम्बू हे इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे, त्यांनी सुमारे दोन वर्ष काम केल्यानंतर नोकरीला रामराम ठोकला आणि ते भारत परतले. श्रीधर वेम्बू यांना मायदेशात परतल्यानंतर कुठल्याही नातेवाईकांनी आधार दिला नाही, तसेच त्यांचा हा निर्णय कशाप्रकारे चुकीचा आहे हे त्यांना वेळोवेळी समजावण्यात आलं. मात्र स्वतःच्या निर्णयावर(Business Success Story) ठाम असलेल्या श्रीधर यांनी कुणाचं ऐकलं नाही.

भारतात कशी उभी केली स्वतःची कंपनी?

भारतात व्यवसाय करण्याचा उद्देश पक्का असल्याने श्रीधर वेम्बू यांनी वर्ष 1996 मध्ये त्यांच्या भावाच्या मदतीने एडवंट नेट (AdventNet) नावाची एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव पुढे 2009 मध्ये बदलून Zoho कॉर्पोरेशन असे करण्यात आले. या कंपनीचे कार्यालय कुठलेही मोठमोठ्या शहरातून तमिळनाडू मधल्या तेनकासी जिल्ह्यात आढळते. त्यांच्या या निर्णयामुळे या भागाला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला. आज या कंपनीत सुमारे 500 कर्मचारी काम करतात व त्यांचा वर्ष 2022 मध्ये एकूण महसूल 8300 कोटी रुपयांच्या ही पार गेला होता (Business Success Story). भारत सरकारकडून त्यांच्या या कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार होते, मात्र श्रीधर वेम्बू यांना ही गोष्ट न पचल्यामुळे त्यांनी बक्षिसाचा स्वीकार केला नाही तसेच निस्वार्थीपणे काम करणाऱ्या समाजसेवकांना हा पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती त्यांनी सरकार दरबारी केली.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आजूबाजूच्या मुलांना शिक्षण देण्याचा काम केलं होतं, यातूनच श्रीधरबेंबू हे केवळ उद्योजक नसून समाजसेवकही आहेत याची प्रचिती येते. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण Zoho या कंपनीमध्ये वर्ष 2000 पर्यंत भारतात एकूण 115 तर अमेरिकेत 7 इंजिनियर काम करत होते आणि हा व्यवसाय तेव्हा दहा मिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला होता. वेम्बू यांच्या एका निर्णयामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीला देखील चालना मिळाली आहे. त्यामुळे वेम्बू हे खरोखरच केवळ एक उद्योजक नसून समाजासाठी कार्य करणारे निस्वार्थी समाजसेवक देखील आहेत.