Business Tips : तुम्ही पैसे कमावण्यासाठी एका पेक्षा अनेक पर्याय निवडले आहेत का? म्हणजे नोकरी बरोबर इतर माध्यमांचा वापर करून तुम्ही पैसे कमावत आहात का? तर आजची बातमी तुमच्यासाठी खास महत्वाची आहे. सरकारकडून एका पेक्षा अनेक पर्याय निवडण्यावर जरीही काही रोख लावला गेलेला नसला तरीही काही गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. कारण ज्या कंपनीसोबत तुम्ही नियमबद्ध आहात तिथे या गोष्टीमुळे अडचण निर्माण होऊ शकते.
तुम्ही अन्य स्त्रोत वापरून पैसे कमावता का? (Business Tips)
कंपनी सोबत वचनबध असताना तुम्ही इतर स्त्रोत वापरून पैसे कमवत असाल तर याची माहिती कंपनीला देणं तुमच्याच हिताचं आहे. तुम्ही ज्या कंपनी सोबत काम करत आहात त्यांच्या नियम व अटी काय सांगतात हे सर्वात आधी तपासून घ्या. सोशल मिडियाचा वापर करून अनेक लोकं इंफ्ल्यूयेन्सार्स बनतात आणि भरगोस कमाई करतात हे तुम्ही पहिलच असेल आणि म्हणून आपणही असाच पैसा कमवू शकतो हा विचार तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
आजकाल अनेकजण सोशल मिडियाचा वापर करून एक्स्ट्रा इन्कम मिळवू पाहतात आणि वाढती महागाई पाहता ते गरजेचं आहेच. तुम्ही तुमची आवड जपण्यासाठी जर का नवीन काही करू पाहत असाल तर अवश्य करावं. पण हातात असलेली नोकरी महत्वाची असल्यामुळे याबद्दल माहिती कंपनीच्या HR ला दिलेली कधीही चांगली. तुमची हातात असेली नोकरी धोक्यात जाईल असं कोणतंही पाऊल उचलू नका. आणि सोबतच तुमची आवड सुद्धा जोपासा