Business Types : व्यवसायाचे कोणकोणते प्रकार असतात? निवड करताना नेमकी कशी करावी?

बिझनेसनामा ऑनलाईन । व्यवसाय (Business Types) हा आपल्या जीवनतील एक महत्वाचा भाग आहे. तुमच्या आजूबाजूला नजर फिरवलीत तर लक्ष्यात येईल कि कित्तीतरी लोकं आपलं जीवन चालवण्यासाठी व्यवसाय करतात. मग तो व्यवसाय सध्या फळ भाज्यांचा असेल किंवा कपड्या भांड्यांचा. आजच्या तरुण पिढीला कुणाच्या हाताखाली काम करायची इच्छा नसते त्यामुळे अनेकवेळा ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यावर लक्ष केंदित करतात. शिवाय आपल्या देशात असे अनेक थोर मोठे लोकं आहेत ज्यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत आज नाव आणि पैसा दोन्ही कमावलं आहे. पण व्यवसाय म्हणजे नेमकं काय आणि त्याचे किती प्रकार असतात हे आज पाहूया…

व्यवसाय म्हणजे काय?

सोप्या शब्दात मांडायचं तर आपण विकलेल्या उत्पादांसाठी ग्राहकांकडून पैसे घेणे. जुन्या काळात वस्तूंच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार केला जायचा (Barter System Of Exchange) मात्र काळानुसार हि पद्धत बदलली आणि घेतलेल्या वस्तूच्या बदल्यात आपण पैसे द्यायला सुरुवात केली. हजारो वर्षांपूर्वी व्यवसायाचे (Business Types) स्वरूप आजच्यापेक्षा फारच वेगळे होते असं म्हणायला हरकत नाही. आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा किंवा सेवांचा पैसे कामावण्यासाठी केलेला व्यवहार म्हणजे व्यवसाय. व्यवसायातून आपल्याला भरपूर फायदा व्हावा केवळ हाच एक उदेश घेऊन व्यावसायिक यांची सुरुवात करत असतो. पण केवळ नफा कमावणेच नाही तर समाजात वावरणाऱ्या लोकांच्या गरजा पुरवणं हा देखील व्यवसायाचा अजून एक उद्देश आहे.

व्यवसाय कसा निवडावा?

कोणतेही काम सुरु करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आवड. तुम्ही जे काही काम कराल त्यात जर का तुम्हाला आवड असेल तर तुम्ही आनंदी राहता आणि येणारे कोणतेही संकट पेलावण्याची तुम्ही तयारी असते. याव्यतिरिक्त तुम्ही बाजारातील घडामोडींचा अंदाज घेणं गरजेचं आहे. बाजारात कोणत्या गोष्टींना महत्व आणि मागणी आहे, लोकांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेऊन नंतरच आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी.

व्यवसायाचे प्रकार कोणते? Business Types

वस्तूंची विक्री आणि सेवांचे उत्पादन यानुसार व्यवसायांचे विभाजन चार प्रकारांमध्ये (Business Types) केले जाते.

१) प्राथमिक व्यवसाय:

प्राथमिक व्यवसायामध्ये नैसर्गिक संसाधनांचा थेट वापर केला जातो. हा प्रकार पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि यात अधिकाधिक मनुष्यबळाची गरज असते. निसर्गाकडून मिळणाऱ्या संधानांचा वापर करून जास्तीत जास्त मानवी गरजा इथे पुरवल्या जातात.

उदाहरण: शेती, बागायती, कुकुट पालन, दुधाचा व्यवसाय इत्यादी.

२) द्वितीय व्यवसाय:

या प्रकारात कच्च्या मालाचे रुपांतर पक्क्या मला केले जाते. हे रूपांतरण झाल्यानंतर पक्क्या मालाची किंमत आणि उपयोग दोन्ही वाढतात.

उदाहरण: खनिजातून धातू शोधणे, वस्तू तयार करणे इत्यादी.

३) तृतीयक व्यवसाय:

या व्यवसायांमध्ये वस्तूंपेक्षा सेवांवर अधिक भर दिला जातो. इथे लोकांच्या गरजांप्रमाणे त्यांना विविध सेवा दिल्या जातात.

उदाहरण; शिक्षण, आरोग्य सेवा, दूरसंचार इत्यादी

४) चतुर्थक व्यवसाय:

हा प्रकार पूर्णपणे मानवी कौशल्यांवर आधारित आहे. पहिल्या तीन व्यवसाय प्रकारांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम हा प्रकार करतो.

उदाहरण: संशोधन, मार्गदर्शन इत्यादी.