Byju’s ED Notice । Byju’s या कंपनीचे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ही कंपनी ऑनलाइन माध्यमांचा वापर करून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवण्या देण्याचं काम करते. परंतु सध्या Byju’s या कंपनीसाठी डोकेदुखी बनणारं एक प्रकरण समोर आलं आहे. 9,362 कोटी रुपयांच्या विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन कंपनीकडून करण्यात आल्यामुळे कंपनीच्या नावे ED ने नोटीस जारी (Byju’s ED Notice) केली अशी बातमी समोर आली आहे. मात्र Byju’s या कंपनीने या सर्व गोष्टी खोट्या आहेत असं म्हणून हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत, पण नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..
ED ने का टाकला Byju’s Company वर छापा? Byju’s ED Notice
Byju’s या कंपनीचं नाव बऱ्यापैकी प्रचलित आहे आणि ED कडून जर का त्यांची खरोखर तपासणी (Byju’s ED Notice) केली जात असेल तर ही बातमी आता त्यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा म्हणावी लागेल. समोर आलेल्या बातम्या सांगतात कि एप्रिल महिन्यात EDने Byju’s Compan च्या वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले होते, ज्यानंतर कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्र यांनी आपण परकीय चलन कायद्याचे पूर्णपणे पालन करीत आहोत असे पत्र लिहून स्पष्टीकरण दिले होते. सोबत ते असही म्हणाले की Byju’s Companyमुळे भारतात सर्वात जास्त FDI आले आहेत आणि 55 हजार पेक्षा अधिक लोकांना Byju’s मुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Byju’s करतेय आर्थिक संकटांचा मुकाबला:
अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा वापर करून प्रशिक्षण देणारी Byju’s ही कंपनी सर्व प्रसिद्ध आहे. मात्र कंपनी गेल्या दीड वर्षापासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे. समोर आलेले आकडे सांगतात की वर्ष 2021 मध्ये Byju’s Companyचे एकूण 4,589 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे, एवढेच नाही तर त्यांच्या उत्पन्नातही मोठी घसरण झालेली असून आता नवीन आकडा हा 248 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक संकटांना तोंड देत असताना जर का EDने केलेले आरोप हे Byju’s Companyच्या बाबतीत खरे असतील तर कंपनीला एका भल्या मोठ्या संकटाला सामोरे जावं लागू शकतो. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर न आलेली असल्यामुळे नेमका घोटाळा काय झालाय याबद्दल सांगता येणार नाही.