Byju’s News: गेल्या अनेक दिवसांपासून Byjus चर्चेचा विषय बनला आहे, कारण या सर्वपरिचित कंपनीकडे पैश्यांची बऱ्यापैकी चणचण सुरु आहे. अश्यातच कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी CEO बायजू रवींद्रन यांच्या विरोधात विधान केल्यानंतर ही परिस्थिती बऱ्यापैकी चिघळली. आज माध्यमांना मिळालेला माहितीनुसार कंपनीने काही ट्युशन सेंटर्स बंद केले आहेत, आणि यांची संख्या बऱ्यापैकी जास्ती असल्याने खरोखर ही गोष्ट कंपनीसाठी धोकादायक ठरू शकले का हे पाहावं लागेल.
Byju’s ने घेतलाय मोठा निर्णय:
अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या BYJU’s ला आर्थिक बचत करण्यावर सध्या भर द्यावी लागत आहे, त्यामुळे कंपनीने 292 पैकी 30 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्च कमी करणे हाच यामागील मुख्य उद्देश असून, BYJU’s तिसऱ्या वर्षात बहुतेक शाखांमधून नफा कमावण्याचे ध्येय ठेवून आहे.
हा निर्णय जाहीर करताना कंपनीने सांगितले की आत्तापर्यंत सर्व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांना कौतुक आहेच, आणि लवकरात लवकर त्यांना कंपनीला मिळणार नफा देखील वाढवावा लागेल (Byju’s News). आता BYJU’s च्या 90 टक्के Tuition Centers , म्हणजेच 292 पैकी 262 केंद्रं HighTech आणि Super Modern पद्धतीने चालणार आहेत. या नवीन Hybrid Model मध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन शिकवणीचा सर्वोत्तम मिलाफ असेल त्याचबरोबर येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर केला जाणार आहे.