Byjus News: शैक्षणिक टेक्नॉलॉजी कंपनी Byju’s सध्या आर्थिक अडचणीत असून अनेक वादळांचा सामना करत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये कंपनीचे संस्थापक आणि CEO बायजू रवींद्रन यांना हटवावे असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, या वृत्ताच्या दुसऱ्याच दिवशी CEO रवींद्रन यांनी स्पष्टीकरण देत मीच CEO आहे आणि पुढेही कायम राहीन, तसेच कंपनीच्या व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले.
बायजू रवींद्रच असतील कंपनीचे मालक: (Byjus News)
माध्यमांकडून बायजू रवींद्रन त्यांना CEO पदावरून हटवल्याच्या बातम्या रंगल्यानंतर Byju’s संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुंतवणुकदारांना पत्र लिहून मोठे विधान मांडले. या पत्रात त्यांनी आपण CEO असल्याचे स्पष्ट केले आणि कंपनीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे म्हटले आहे. कंपनीत चालू असलेल्या संकट काळात काही गुंतवणुकदारांनी त्यांना CEO पदावरून हटवण्याच्या बातम्या रंगवल्या आणि त्यानंतर बायजू रवींद्रन म्हणाले, “मी तुम्हाला आमच्या कंपनीचे CEO म्हणून हे पत्र लिहित आहे, यापुढे कंपनीच्या व्यवस्थापनात कोणताही बदल होणार नाही आणि बोर्डही तसेच राहील.”
Byju’s ची सुरुवात कशी झाली?
2011 मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुळनाथ यांनी Byju’s ची स्थापना केली होती. थोड्याच वेळात Byju’s हे Learning App लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले (Byjus News). रवींद्रन यांनी स्वतः अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि त्यांनी 2006 मध्ये विद्यार्थ्यांना गणिताचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. Byju’s Learning App वर्ष 2015 मध्ये लाँच झाले आणि हे स्टार्टअप पुढील 4 वर्षांत उदयास आले. शाळा आणि कोचिंग बंद असलेल्या कोरोनाच्या काळात याच App चा सर्वाधिक वापर झाला होता.