Byju’s News: शासकीय संस्था प्रवर्तन निदेशालय (ED) ने भारतातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी Byju’s कंपनीचे संस्थापक आणि CEO बायजू रवींद्रन यांच्यावर Look Out Circular (LOC) जारी करण्याची विनंती केली आहे. हा LOC जारी करण्यासाठी ED ने या महिन्यात Bureau Of Emigration (BOI) सोबत संपर्क साधला आहे. सध्या आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या Byju’s ही कंपनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.
Byju’s समोर उभं ठाकलंय नवीन संकट: (Byju’s News)
एक वर्षापूर्वी EDच्या कोची कार्यालयाने रवींद्रन यांच्यावर प्रवासाबाबत माहिती मिळवण्यासाठी LOC जारी केला होता, पण चौकशी आता बंगळुरूकडे हस्तांतरित झाली आहे. यामुळे त्यांना परदेशात जाण्यापासून कोणी थांबवणार नाही, पण त्यांच्या प्रवासाची माहिती चौकशी यंत्रणेला मिळत राहील. बेंगलुरु येथील ED कार्यालय रवींद्रन यांच्यावर परदेशात जाण्यावर बंदी घालण्यासाठी LOC जारी करण्याची शिफारस करत आहे, कारण त्यांची संस्था FEMAच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा संशय आहे. रवींद्रन जर देशाबाहेर गेले तर त्यांना परत येताना भारत सोडून जाण्यास मंजुरी मिळणार नाही.
बायजू रवींद्रन गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली आणि दुबईत राहतात. या आठवड्याच्या सुरुवातीला ते कामासाठी बेंगलुरुला आले होते. गेल्या आठवड्यात ते दिल्लीलाही गेले होते. सध्या ते दुबईत आहेत आणि लवकरच ते सिंगापूरला जाणार आहेत. एका सूत्राने सांगितले की, सरकारने रवींद्रन यांच्यावर ‘लोकाऊट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्याची मागणी केली आहे. हा आदेश लागू झाल्यावर भारतात परत आल्यावर रवींद्रन बाहेर जाऊ शकणार नाहीत.
Byju’s कडून कोणती चूक घडली?
Byju’s या कंपनीने भारताबाहेर मोठ्या प्रमाणात परदेशी चलन पाठवले आणि गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे(Byju’s News). यामुळे 1999 च्या FEMA कायद्याचे उल्लंघन झाले असून, त्यामुळे भारत सरकारला उत्पन्नाचा तोटा झाला असण्याची शक्यता आहे, असे अंमलबजावणी संस्थेने म्हटले आहे.