Byju’s News: गुंतवणूदारांच्या मते “बायजू रवींद्रन आणि कुटुंबाने कंपनीबाहेर जावे”; आता पुढे काय होणार?

Byju’s News: Byju’s या EDTECH कंपनीच्या संचालक मंडळाला हटवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कालच्या बैठकीत मोठा धक्का दिला आहे. Prosus, General Atlantic आणि Peak XV या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी झालेल्या एका वार्षिक बैठकी (EGM) मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाची कंपनीमधून कायमची हकालपट्टी करण्यासाठी मतदान केले आहे.

कालच्या बैठकीत काय ठरले? (Byju’s News)

कालच्या बैठकीत उपस्थित सर्व गुंतवणूकदारांचे मतदान घेण्यात आले होते, जिथे सर्वानुमते कंपनीचे CEO रवींद्रन बायजू आणि त्यांच्या परिवाराला कंपनीमधून निष्कासित करावे असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान Byjus मध्ये असलेल्या प्रशासन, आर्थिक कुव्यवस्थापन आणि अनुपालन समस्यांचे निराकरण करण्याची आणि संचालक मंडळाचे पुनर्गठन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

IT क्षेत्रातील शिक्षण कंपनीच्या (EDTECH) शेरधारकांनी कंपनीच्या संस्थापक रवींद्रन यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून, या दाव्याद्वारे त्यांना कंपनीतून हटवण्याची मागणी केली जात आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने रवींद्रन यांना मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र काही शेअरधारकांनी गैरव्यवहार आणि दडपशाच्या आरोपांखाली त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी कंपनीची Forensic चौकशी, नवीन संचालक मंडळ आणि हक्क निर्गती रद्द करण्याचीही वारंवार मागणी केली जात आहे.

या निर्णयावर कंपनीचे म्हणणे काय?

नुकत्याच झालेल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेत (EGM) मध्ये सर्वानुमते बनवलेले ठराव बेकायदेशीर आणि अप्रभावी आहेत असे कंपनी (Byju’s News) सांगते. या बैठकीत फक्त निवडलेल्या गुंतवणूकदारांचा एक लहान गट उपस्थित होता, आणि असा एकतर्फी खेळ उभा करून त्यांनी कायद्याच्या अधिशासनालाच आव्हान दिले आहे असेही कंपनीला वाटते, त्यामुळे आता या बहुरंगी खेळात शेवटी काय होईल हे पाहावं लागेल.