Byju’s News: कंपनीच्या गुंतवणूदारांना वाटते की Byju आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे कंपनीच्या व्यवस्थापनात गडबड झाली आहे आणि काही चूका झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. आज होणारी ही सभा महत्त्वाची आहे कारण तिचा निकाल Byju’sच्या भविष्यावर परिणाम करू शकतो.
रवींद्रन बायजू बैठकीला नाही: (Byju’s News)
BYJU चे संस्थापक आणि बोर्ड सदस्य रवींद्रन या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी ही बैठक “नियमबाह्य” असल्याचं म्हटलं आहे. कंपनीच्या नियमावली आणि शेअरधारक कराराच्या विरुद्ध ही बैठक असल्याचं त्यांचं मत असल्याने रवींद्रन आणि इतर बोर्ड सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. जर ही बैठक झाली तरी निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे लोक उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे चर्चा किंवा मतदान होऊ शकणार नाही. संस्थापक आणि बोर्डाची जबाबदारी म्हणून स्थापित नियम आणि कंपनीची प्रतिष्ठा राखण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत असे त्यांनी काबुल केले.
यावर गुंतवणूकदार काय म्हणतात?
गुंतवणूकदारांनी Byju’s च्या समस्येवर झालेल्या बैठक वैध आणि नियमानुसार घेतली असून ती नियोजित वेळेनुसार सुरू राहील. संस्थापक उपस्थित नसले तरी बैठक होणारच आहे आणि उपस्थित संख्या ही मतदानासाठी पुरेशी असेल असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
Byju’s च्या अधिग्रहणाबाबत गुंतवणूकदारांकडून महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप असताना, कंपनीच्या व्यवस्थापनावर उच्च न्यायालयाने टीका केली. त्यामुळे, न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत EGM दरम्यान पारित झालेल्या कोणत्याही ठरावांची अंमलबजावणी रोखून धरली आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूकदारांना बैठक घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली असून हे सर्व प्रकरण कंपनीच्या 2021 मध्ये झालेल्या 950 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या अधिग्रहणशी संबंधित आहे.