Byju’s Salary Deadline: आर्थिक चणचण असलेल्या कंपनीच्या 20,000 कर्मचाऱ्यांना मिळेल का पगार?

Byju’s Salary Deadline: आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या Byju’s कंपनीच्या कर्मचारी वर्गावर या परिस्थितीचा वाईट परिणाम दिसून येऊ लागला आहे. कंपनीच्या 20,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार मिळण्याची चिंता लागून राहिली असून नुकत्याच केलेल्या ‘Rights Issue’मध्ये मधील पेचामुळे 10 मार्चचा पगारा भरण्याची अंतिम तारीखही पाळणे Byju’s ला कठीण जाणार आहे.

कंपनीला कर्मचाऱ्यांचा पगार देवेना: (Byju’s Salary Deadline)

सध्या सतत चर्चेत असलेली कंपनी म्हणजेच Byju’s आणि सध्या ती कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा नीट देण्याच्या परिस्थितीत दिसत नाही. कंपनीचे संस्थापक आणि CEO Byju Raveendran यांनी यापूर्वी कर्मचारांना पगार वेळेवर मिळेल याची खात्री दिली होती. परंतु, अलीकडे काही कर्मचारांना पगार मिळण्यात विलंब झाल्याच्या बातम्या सुरु असल्याने कंपनी त्यांचे आश्वासन पूर्ण करेल का याबाबत आता कर्मचारी संशयात आहेत.

कंपनीचे प्रमुख रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, बाह्य दबावामुळे पगार वेळेत करता येत नाही याबद्दल खेद व्यक्त केला होता. तसेच गुंतवणुकदारांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांनी जमा केलेली रक्कम पगारा देण्यासाठी वापरण्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला होता(Byju’s Salary Deadline). आताच्या घडीला एकूण परिस्थिती पाहता कंपनी अजूनही आर्थिक चढ उतारांचा सामना करत आहे आणि म्हणूनच या परिणामी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण होऊ लागली आहे.