PM Kisan Yojana : एकाच कुटुंबातील पति-पत्नी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का?

बिझनेसनामा ऑनलाईन । सरकार ‘सबका साथ सबका विकास सबका विकास सबका प्रयास’ आपल्या नवनवीन योजनांद्वारे देशातील जनतेस सहाय्य करण्यास वचनबद्द आहे. त्याच उपक्रमाअंतर्गत देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी (PMKISAN) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घेऊन आले आहे . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिला जातो.आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत, देशभरातील मोठ्या संख्येने शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

आतापर्यंत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर केंद्र सरकार 26 मे ते 31 मे दरम्यान पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करू शकते. या योजनेचा शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी दोघांनाही फायदा होईल का? जाणून घेऊया…

पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळेल का?-

पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. त्यामुळे पती-पत्नी दोघेही शेतकरी असले तरीही कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. स्वतः सरकारने पीएम किसान पोर्टलवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेत शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती नोंदणी करू शकते. यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द केली जाईल. दुसरीकडे, या योजनेचा लाभ दोन्ही लोकांना मिळत असेल, तर सरकार त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येईल.

याप्रमाणे लाभार्थ्यांची यादी पहा-

ज्या शेतकऱ्यांनी 13 व्या हप्त्यानंतर नोंदणी केली आहे आणि ते या योजनेशी आधीच जोडलेले आहेत, त्यांना पुढील हप्ता मिळेल की नाही हे सहज कळू शकते. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध लाभार्थ्यांची यादी पाहून, तुम्हाला 14 व्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळतील की नाही हे कळू शकते.

तुमचे नाव PM किसान योजना सन्मान निधीत आहे कि नाही ते खालील पर्यायांचा अवलंब करून ऑनलाइन तपासू शकता.

तुम्ही घरबसल्या PM किसान 2023 च्या नवीन यादीत तुमचे नाव तपासू शकता.

सर्वप्रथम farmer corner च्या खाली beneficiary list आहे तिथे क्लीक करा.
सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे शेतकरी कोपरा अंतर्गत लाभार्थी यादी पर्याय आहे.
लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेज उघडेल. यामध्ये प्रथम राज्य, नंतर जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गाव निवडा.
मागितलेली सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.
असे केल्याने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.
ही यादी पाहून तुमचे नाव लाभार्थी शेतकर्यांमध्ये आहे की नाही हे कळू शकते.