Canara Bank FD Rates : वेगवेगळ्या बँका आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येतात. ग्राहकांना टिकवून ठेवणे आणि नवीन ग्राहक जोडणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. बँक ऑफ बडोदानंतर आता कॅनरा बँक त्यांच्या ग्राहक वर्गासाठी नवीन FD रेट्स घेऊन आली आहे. FD म्हणजे काय तर फिक्स्ड डेपोझीट, इथे एकदा गुंतवलेली रक्कम तुम्हाला मुदतीच्या आधी काढता येत नाही. तर आज जाणून घेऊया ही बँक आपल्या फिक्स्ड रेटबद्दल नेमके काय बदल केले आहेत, याबद्दल…
कॅनरा बँकने जारी केले नवीन FD रेट्स: Canara Bank FD Rates
कॅनरा बँकेकडून 2 करोड रुपयांपेक्षा कमी किमतीवरील फिक्स्ड डेपोझीटचे दर (Canara Bank FD Rates) बदलले आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 ऑक्टोबर 2023 पासून नवीन दर अमलात आणण्यात आले आहेत. नवीन झालेल्या बदलांप्रमाणे सामान्य माणसांसाठी नवीन व्याजदर 4 ते 7.25 टक्के असा असणार आहे आणि हाच दर सवलतीच्या दरात वयस्कर माणसांसाठी 4 ते 7.75 टक्के असा असेल आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माणसांसाठी 0.60 टक्के जास्ती व्याजदर दिला जाईल. हा दर 7 दिवस ते 10 वर्ष अश्या मुदतीवर उपलब्ध केला जात आहे.बँक आता 7 ते 45 दिवसांपर्यंत तयार होणाऱ्या फिक्स्ड डेपोझीटवर 4 टक्के व्याजदर देत आहे,तसेच 46 ते 90 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याजदर देऊ करत आहे.
हेच दर 91 ते 179 दिवसांसाठी 5.50 टक्के आहे आणि 180 ते 269 दिवसांसाठी 6.15 व्याजदर देत आहे. एका वर्षासाठी केलेल्या गुंतवणूक केलेल्या रकमेवर तुम्हाला 6.90 टक्के व्याज दिले जाईल आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्ती मोठ्या गुंतवणुकीवर 6.85 टक्के व्याजदर लागू केला जाईल. लक्ष्यात घ्या कि बँक हे दर केवळ नवीन आणि रिन्यू होणाऱ्या FD वरच देऊ करेल. मात्र वेळेच्या आधी जर का तुम्ही रक्कम परत घेण्याचा प्रयत्न केलात तर मात्र 1.00 टक्क्यांचा दंड आकारण्यात येईल.