बिझनेसनामा ऑनलाईन । चंद्रयान-3 ही (Chandrayaan 3 Share) मोहीम भारतासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. भारताच्या या यशाने एरोस्पेसशी संबंधित सर्व देशांतर्गत कंपन्यांची चांदी झाली आहे.भारताची मोहीम जशी यशस्वी झाली तसे या मोहिमेचा भाग बनलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत दुपट्टीने वाढत गेली. साधारणपणे ही किंमत 30 हजार करोड एवढी झाली आहे. इस्रोच्या संस्थेबरोबरच ह्यामध्ये इतर कंपन्यांचाही समावेश आहे. भारताने अवघ्या 615 कोटी रुपयांमध्ये चांद्रयान 3 मोहीम उभारली होती आणि आता फक्त ३ दिवसांतच या चांद्रयानाने तब्बल 30 हजार करोड रुपयांचा फायदा करून दिला आहे.
कोणकोणत्या कंपन्याचे शेअर्स वधारले– (Chandrayaan 3 Share)
या मध्ये प्रामुख्याने हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड ( HAL ) ह्या कंपनीला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. कंपनीचे शेअर्स 5% नी वधारले आहे. तसेच गोदरेज एरोनॉटिक्स, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, वालचंद नगर इंडस्ट्रीज आणि सेंटम इलेक्ट्रॉनिक्स या महत्वाच्या कंपन्यांनी चंद्रयान तीन मोहिमेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे चंद्रयान ३ च्या यशानंतर या कंपनीचे शेअर्स बाजारात वधारलेले दिसून येत आहेत.
चंद्रयान-3 आणि शेअर्सच्या कंपन्यांचा संबंध काय?
भारतीय मोहिमेसाठी मार्केटमधील अनेक बड्या कंपन्यांनी विविध घटक उपलब्ध करून दिले होते. आणि त्यावर शेअर्स गुंतवले (Chandrayaan 3 Share) होते. चांद्रयान -3 साठी महत्वाची असलेली अनेक उपकरणे भारतातील सरकारी व खाजगी कंपन्यानी बनवलेली आहेत. ही सर्व उपकरणे यशस्वीपणे चंद्रयान -3 च्या विक्रम लँडर व रोवर सोबत काम करताना पाहायला मिळत आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्या शेअर्सची किंमत वाढणार ही आशा आज फळाला आली.
मोहिमेसाठी कोणते घटक कोणत्या कंपन्यांनी पुरवले?
1) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स-
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच BHEL च्या शेअर्सही वाढ होत आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी BHEL ने इस्रोला बॅटरीचा पुरवठा केला आहे.
2) हिंदुस्थान एरोनॉटिक्स–
हिंदुस्तान एरोनॉटिक्सने चांद्रयान-३ च्या निर्मितीसाठी अनेक आवश्यक घटक पुरवले आहेत.
3) सेंटम इलेक्ट्रॉनिक्स–
आतापर्यंत सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने वेगवेगळ्या अंतराळ मोहिमांसाठी सुमारे ५०० घटक पुरवले आहेत.
4) वालचंदनगर इंडस्ट्रीज–
गेल्या एका महिन्यात वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
5) लार्सन आणि टर्बो–
L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग सुविधेने चांद्रयान-३ साठी स्पेस हार्डवेअर आणि बूस्टर सेगमेंट तयार केले आहेत. अम्बिलिकल प्लेट पुरवण्यासोबतच, कंपनीने लॉन्च व्हेईकलच्या सिस्टम इंटिग्रेशनमध्येही मदत केली आहे.