Cheap Airtel Recharge Plan: सध्या देशभरात Jio आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांची सर्वत्र चर्चा सुरू असली तरी देखील Airtel कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना सवलतीच्या दरात मोबाईल रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याच्या तयारीत नेहमीच असते. इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे एअरटेल देखील ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना विशेष सवलती पुरवण्याचे काम करते. आजही एअरटेलचे करोडो ग्राहक बाजारात वावरत आहेत. आणि यांपैकी एक तुम्ही असाल तर एअरटेल टेलिकॉम कंपनीने ग्राहकांना खुश करण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक चांगली बातमी आणली आहे. या नवीन रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्ही पैसे वाचवत अधिकाधिक सवलतींचा फायदा मिळवू शकता. एअरटेल कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना एका वर्षासाठीचा सर्वात स्वस्त असा प्लॅन (Cheap Airtel Recharge Plan) उपलब्ध करून देण्यात आला आहे, यासाठी ग्राहकांना प्रति दिवस फक्त पाच रुपये मोजावे लागतील. हा अनोखा प्लॅन नेमका आहे तरी काय जाणून घेऊया.
दर दिवशी 5 रुपये मोडून मिळवा वर्षभराचा आनंद: Cheap Airtel Recharge Plan
एअरटेलने ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर असा एक नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनची वार्षिक किंमत 1,799 रुपये आहे ज्यात तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेट आणि 3600 मोफत एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दरम्यान जर का तुमचा इंटरनेट डेटा संपला तर तुम्ही डेटा बूस्टर प्लॅनचा वापर करू शकता. एक तर दरमहिन्याला रिचार्ज करण्याची गरज पडत असल्याने आपण त्रस्त असतो म्हणूनच वर्षभराचा हा प्लॅन तुम्हाला मासिक रिचार्जच्या त्रासापासून मुक्त करेल (Cheap Airtel Recharge Plan).
विचार केला तर वर्षाला 1,799 रुपये म्हणजेच दर दिवशी 5 रुपयांचा खर्च करावा लागेल. कंपनीकडून देण्यात आलेल्या या स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला दोनशे रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागेल, एवढेच नाही तर कंपनी आपल्या वापरकर्त्यांना wink म्युझिकचे मोफत सबस्क्रीप्शन देत आहे. इथे तुम्हाला फास्टट्रॅक रिचार्जवर शंभर रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जाईल त्यामुळे कमीत कमी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम रिचार्ज प्लान ठरू शकतो.