Cheap Mobile Phones: उद्या येणाऱ्या बजेटपूर्वीच आज बाजारात बरीच धूम माचली आहे, शेअर बाजार तर धमक्यात उघडलेच पण त्याच सोबत मोदी सरकारच्या एका नवीन घोषणेमुळे अनेकजणं खूष झाले आहेत. मोदी सरकारने मोबाईलच्या पार्टसवर लागणारी Import Duty कमी केल्याची घोषणा केल्याने देशांर्गत मोबाईलच्या किमती कमी होण्याची चिन्ह तयार होत आहेत. मोबाईल हे आजच्या जगात केवळ एक साधन नाही तर ती एक गरज बनली आहे, आणि असे स्वस्तात मिळणारे मोबाईल फोन नक्कीच ग्राहकांना फायदा करवून देतील.
मोदी सरकारचा नवीन निर्णय: (Cheap Mobile Phones)
बजेट प्रस्तुत होण्याआधीच सरकारने नवीन घोषणा केली आहे, या घोषणेत सरकारने 15 टक्क्यांची इम्पोर्ट ड्युटी (Import Duty) कमी करून 10 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे, आणि सरकारच्या याच खास निर्णयामुळे आता देशांर्गत मोबाईलच्या किमती कमी होण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते. मोदी सरकारच्या अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट प्रस्तुत करतील. या बजेटकडून देशातील विविध क्षेत्रांना अनेक अपेक्षा आहेत, मात्र त्यातील किती अपेक्षा पूर्ण होतात आणि किती फोल ठरतात हे पाहावं लागेल.
आज आपल्यासमोर आलेली सर्वात मोठी बातमी मोदी सरकारचा हाच निर्णय असेल. आता हा निर्णय महत्वाचा का? तर इम्पोर्ट ड्युटी कमाई झाल्याने मोबाईल मॅन्युफॅक्टरिंगची (Mobile Manufacturing) किंमत कमी होते, मोबाईल कंपन्यांना अधिक खर्च करावा लागत नाही आणि म्हणूनच देशात विकारी केल्या जाणाऱ्या मोबाईलसची किंमत कमी होईल अशी अपेक्षा बाळगली जाऊ शकते. काही दिवस मागे वळून पाहिलं तर देशातील काही मोबाईल कंपन्यांनी सरकार दरबारी इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती आणि आज सरकारने या मागणीचा स्वीकार करत हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
भारतातील मोबाईल उद्योगाला चालना मिळणार?
सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या अंदाजानुसार, भारतातून मोबाईल फोनची निर्यात 2024-25 पर्यंत 3 पटीने वाढून 39 अब्ज डॉलर होईल. ही वाढ सरकारने घटकांवरील आयात शुल्क कमी केल्याने आणि काही श्रेणींमधून ते काढून टाकल्याने होणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, भारतातून केवळ 11 अब्ज डॉलर किमतीचे मोबाइल फोन निर्यात झाले होते. तथापि, ICEA चे म्हणणे आहे की आयात शुल्कात कपात झाल्यामुळे, भारतीय उत्पादकांना अधिक स्पर्धात्मक किमतीत मोबाइल फोन तयार करता येतील, यामुळे त्यांना परदेशी बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होईल.
CEA च्या म्हणण्यानुसार, भारतीय मोबाईल उद्योगाने आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुमारे 50 अब्ज डॉलर किमतीचे मोबाइल फोन तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे (Cheap Mobile Phones). हे उत्पादन पुढील आर्थिक वर्षात 55-60 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा भरगोस फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होईल.