Cheaper Medicines: आजकाल डॉक्टरकडे उपचारासाठी जायचं म्हणजे एक वेगळंच संकट म्हणावं लागेल. आजार मोठा असो किंवा लहान पैसे मात्र अधिक प्रमाणात कापले जाणार हे निश्चित असतं. साधी सर्दी जरी ठीक करायची म्हटलं तरीही खर्चाचा आकडा सहज हजार रुपयांच्या घरांत जाऊन पोहोचतो. त्यात आपल्या देशात वाढणाऱ्या शुगर, सर्दी ताप आणि ह्रिदयाच्या आजारांबद्दल तर काय बोलावं. मात्र आजची ही बातमी वाचून तुम्हाला थोडा आधार मिळणार आहे, कारण बाजारातील काही औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत.
बाजारातील औषधांच्या किमती कमी झाल्या? (Cheaper Medicines)
वाढत्या रोगराईपासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेलं नाही, वाढती रोगराई ही वैश्विक समस्या आहे. आपल्या देशात कोविडच्या महामारीपासून सर्दी आणि तापाचे प्रमाण बऱ्याच टक्क्यांनी वाढलंय. डायबिटीस (Diabetes), हार्ट प्रॉब्लम्स (Heart Problems) हे तर आपल्याकडे कैक वर्षांपासून जगणं मुश्किल करत आहेत. प्रत्येकाच्या घरात वरील आजारांनी त्रस्त एक व्यक्ती तरी किमान पाहायला मिळतेच आणि म्हणून औषधांच्या वाढत्या किमती आपला खिसा रिकामा करतात.
औषधांच्या काळाबाजारीला आळा घालण्यासाठी, राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणा (NPPA) ने 39 औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. NPPA ने या औषधांची यादी जाहीर करत नागरिकांना दिलासा दिला आहे आणि विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये मधुमेह, वेदनाशामक (Painkiller), ताप आणि हृदय, सांधेदुखी यांसारख्या आजारांवर उपचार करणारी औषधे समाविष्ट आहेत.
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा फायदा होईल, एक म्हणजे आपल्याकडे वरील आजारांवर होणार खर्च अधिक असतो आणि आता औषधांच्या घसरलेल्या किमतींमुळे गरीब आणि गरजू लोकांना महागड्या औषधांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. औषधांच्या किमती कमी करण्यामागे (Cheaper Medicines) दुसरं कारण म्हणजे आता NPPA या औषधांच्या किमतीवर लक्ष ठेऊन काळाबाजारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. या निर्णयामुळे औषध क्षेत्रात पारदर्शकता येण्यास मदत होईल आणि नागरिकांना औषधे योग्य दरात मिळतील याची खात्री होईल.