Cheque Bounce Law । चेक बाउन्स होण्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, चेक बाउंस होणे म्हणजे काय तर तुम्ही जारी केलेली रक्कम आर्थिक व्यवहारासाठी ग्राह्य धरली जात नाही. पण याला तुम्ही एखादी किरकोळ गोष्ट समजून दुर्लक्ष करत असाल तर हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. बँकिंगच्या क्षेत्रात याला एक मोठा गुन्हा समजला जातो आणि सदर माणसाला शिक्षा सुद्धा भोगावी लागते. आपण नेहमीच चेकवर रक्कम टाकल्यानंतर पुढे Only असा शब्द टाकतो आणि तो फारच महत्वाचा आहे, तसं न केल्यास काय होईल जाणून घेऊया……
चेकवर ONLY लिहिणं महत्वाचं का?
अनेक लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षा देण्यासाठी काही तजवीज केली जाते आणि चेक समोर ONLY लिहिणं हा त्यातीलच एक भाग आहे. चेकवर रक्कम टाकल्यानंतर ONLY असं लिहिल्यामुळे तुमची सुरक्षितता वाढायला मदत होते तसेच कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहता येतं. ONLY असा शब्द लिहिल्यामुळे कुठलीही व्यक्ती अनियंत्रित रक्कम बँकमधून काढू शकत नाही. एखादी रक्कम टाकून जर का ONLY असं न लिहिताच तुम्ही चेक देऊ केलात तर समोरच्या व्यक्तीकडून त्या रकमेत अजून वाढ करवण्याची शक्यता आहे. अश्यावेळी तुम्ही फसवणुकीला बळी पडाल त्यामुळे बँकिंग नियमांचे पालन (Cheque Bounce Law) करत स्वतःची सुरक्षितता जपा आणि पैश्यांची काळजी घ्या.
ONLY न लिहिल्यामुळे चेक बाउंस होईल का? (Cheque Bounce Law)
ONLY हा शब्द न टाकल्यामुळे तुमचा चेक अजिबात बाउंस होणार नाही तर दरवेळी प्रमाणे बँककडून त्याचा स्वीकार केला जाईल. मात्र हे तुमच्या पैश्यांच्या सुरक्षिततेशी निगडीत असल्यामुळे या संदर्भात होईल तेवढी काळजी घेणं कधीही चांगलं. यापुढे बँकसोबत व्यवहार करत असताना ONLY/- लिहायला विसरू नका आणि फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा.