Cheque Bounce Rules : तुम्ही चेक बाउन्स झालेल्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण तुम्हाला माहिती आहे का हा एका प्रकारचा गुन्हा आहे. आपण जेव्हा इतरांना चेकच्या रूपाने पैसे देत असतो तेव्हा हि खात्री करून घेतली पाहिजे कि आपल्या बँकच्या खात्यात चेकवर टाकलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे असणे भाग आहे, जर का अशी परिस्थिती नसेल तर तुमची कृती गुन्हा म्हणून नोंदवली जाईल, आणि त्यावरून मोठा दंडही भरावा लागेल. आज जाणून घेऊया चेक बाउन्स का होऊ शकतो, आणि यासाठी कोणती शिक्षा भोगावी लागू शकते याबद्दल…
चेक बाउन्स कधी होऊ शकतो? (Cheque Bounce Rules)
वर सांगितल्याप्रमाणे चेक वरून पैश्यांची देवाणघेवाण करताना आपल्या खात्यात पुरेशी रक्कम आहे याची खात्री करून घ्यावी, कारण बँकच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास हा चेक बाउन्स होईल. याव्यतिरिक्त आपल्या चेकवर जी सही आहे, ती बँकमध्ये नोंद असलेल्या सही सोबत तंतोतन्त्त जुळली पाहिजे, नाहीतर पैश्यांची रक्कम काढणारा माणूस खातेधारक नाही असे समजून चेक बाउन्स होईल. सही प्रमाणेच तुम्ही टाकलेला खात्याचा नंबर हा व्यवस्थित जुळला पाहिजे आणि चेक वर दिलेल्या तारखांमध्ये काही बदल झाल्यास चेक ग्राह्य धरला जाणार नाही.
चेक बाउन्स झाल्यास शिक्षा आहे का?
चेक बाउन्स झाल्यास नक्कीच तुमच्या विरुद्ध कारवाई (Cheque Bounce Rules) केली जाऊ शकते. ज्याच्या नावे तुम्ही चेक लिहिला होता तीच व्यक्ती तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकते. किंवा ते तुम्हाला तीन महिन्यांची मुदत देऊन पुन्हा पैसे परत करण्याचा मार्ग उपलब्ध करवून देऊ शकतात. चुकीचा चेक जारी करणाऱ्या विरुद्ध मात्र दोन वर्षांपर्यंत खटला चालू शकतो, आणि न्यायालयाकडून सहा महिने ते एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते, तसेच संबंधित आरोप्याला दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल.