China Economy: जगभरातील देशांमध्ये महागाईने कहर माजवला असला तरी पण चीनमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चीनमध्ये डिफ्लेशनची असलेली स्थिती आणि आणखी गंभीर होत चालली आहे. जानेवारी महिन्यात चीनमधील कंज्यूमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) मध्ये 0. 8 टक्क्यांनी घसरण झाली असून, याला सप्टेंबर 2009 नंतर ही सर्वात मोठी मासिक घसरण म्हणावी लागेल. लक्ष्यात घ्या लागोपाठ चौथ्या महिन्यात देशात वस्तू आणि सेवांमधील किमती कमी झाल्या आहेत.
डिफ्लेशन म्हणजे काय?
डिफ्लेशन म्हणजे वस्तू आणि सेवांमधील किमती एका विशिष्ट कालावधीत कमी होणे. हे इन्फ्लेशनच्या विरुद्ध आहे, जेथे किमती वाढतात. सामान्यतः अर्थव्यवस्थेतील निधी पुरवठा आणि कर्जात घट झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते(China Economy). या परिस्थितीमुळे चीनमधली लोकं खर्च करण्यापेक्षा पैसे वाचवण्यास प्राधान्य देत आहेत, यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत जपानसारखी स्थिरता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चीनची आत्ताची परिस्थिती कशी आहे? (China Economy)
चीन जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असली तरी, अलीकडच्या काळात त्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. बेरोजगारी विक्रमी उच्चांकावर पोहोचली असून, रियल इस्टेट क्षेत्र अनेक महिन्यांपासून संकटातून जात आहे. अनेक विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदार चीनमधून पलायन करत आहेत, निर्यात कमी होत आहे आणि अमेरिकेशी तणाव वाढतोय. सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या, परंतु अद्याप त्या यशस्वी झालेल्या नाहीत. यामुळे अर्थव्यवस्थेवर लोकांचा विश्वासही निर्माण होत नाही आणि ते खर्च करण्याऐवजी बचत करण्यात गुंतले आहेत.