Ching Chinese Owner : Ching Chinese कंपनीचे मालक कोण? कसा आहे त्यांचा एकूण प्रवास

Ching Chinese Owner : “चिंग चायनीज, देसी चायनीज” प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगला या जाहिरातीमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलंय. या जाहिरातीपूर्वी चायनीज म्हणजे चीनची खाद्यसंस्कृती असंच आपण म्हणायचो पण यानंतर देशी चायनीज म्हणजे आपल्या भारतात बनणारे चायनीज पदार्थ अशी एक वेगळी ओळख निर्माण व्हायला सुरुवात झाली. मात्र या कंपनीची सुरुवात कोणी केली हे माहिती आहे का? रणवीर सिंघच्या मागे असलेला हा सूत्रधार कोण हे जाणून घेऊया..

चिंग चायनीजचे मालक कोण? Ching Chinese Owner

भारत देशात असे अनेक उद्योजक आहेत जे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची नवनवीन शिखरं गाठतात. अनेकवेळा आपल्याला हे प्रोडक्ट्स माहिती असतात मात्र त्यामागे कष्ट घेणाऱ्या व्यक्तीचा प्रवास नाही. चिंग चायनीज हि अशीच एक कंपनी आहे, आपल्यामधल्या अनेकांनी कंपनीच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतलेला असेल मात्र कंपनीची सुरुवात, याचा मालक कोण, प्रवास कसा होता याबद्दल अधिकांश लोकांना माहिती असणार नाही. तर चिंग चायनीज या कंपनीचे मालक (Ching Chinese Owner) आहेत अजय गुप्ता. अजय गुप्ता हे केपिटल फुड्स लिमिटेड( Capital Foods Limited) या कंपनीचे मालक(MD) आहेत. आणि त्यांनी मेरटमधून कला शाखेची पदवी मिळवली आहे.

अजय गुप्ता यांनी कशी केली चिंग चायनीजची सुरुवात?

आपल्या देशात चायनीज खाद्य पदार्थांना भरपूर वाव दिला जातो. रस्त्याच्या कोपऱ्यावर आणि बाजूला लावलेल्या छोट्या हात गाड्यांवर जाऊन लोकं चायनीज पदार्थांची मजा घेतात, हीच गोष्ट अजय गुप्ता यांच्या लक्ष्यात आली. आणि इथूनच त्याच्या मनात चायनीज खाद्य पदार्थांचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना निर्माण झाली. रस्त्याच्या कडेला मांडलेल्या या हात गाड्यांवर जाऊन त्यांनी चायनीज पदार्थांची चव चाखून बघितली आणि तेव्हा त्यांना उमगलं कि हजारो लोकांच्या पसंतीत उतरलेल्या आणि भारतीय चवीचा हलका हात फिरलेल्या या पदार्थांना विशेष असं नावच नाहीये.

मात्र व्यवसाय हा केवळ कल्पनेवर चालत नसतो, त्यासाठी सर्वात महत्वाचे असतात ते गुंतवणूकदार. अजय यांनी मदत करायला त्यावेळी कुठलाही गुंतवणूकदार समोर आला नाही. मात्र हार न मानता अजय गुप्ता यांनी रस्त्या रस्त्यावर जाऊन या हातगाडी चालकांना आपल्या चिंग चायनीज चटण्या वाटायला सुरुवात केली आणि त्यांच्या पदार्थांमध्ये या चटण्यांचा समावेश करण्यासाठी विनवण्या केल्या आणि प्रोत्साहित केलं.

आज एवढा प्रसिद्ध झालाय चिंगचा व्यवसाय:

कधीकाळी गुंतवणूकदार मिळवण्यासाठी पायपीट करणाऱ्या चिंग चायनीजचा व्यवसाय आज घरोघरी पोहोचला आहे.”चिंग खाओ, बाकी भूल जाओ” या एका वाक्याने सोशल मिडीयावर राज्य करायला सुरुवात केली .त्यांचे आज 100k पेक्षा अधिक फोलोवार्स आहेत आणि 70+ पेक्षा जास्ती व्युज जमा झाले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इथे रणवीर सिंघ यांची नियुक्ती कंपनीच्या यशात उजवी ठरली. आज त्यांची देशातील 11 राज्यांमधील 150,000 स्टोअर्स पर्यंत व्याप्ती पसरलेली आहे, आणि कंपनीचेChing Chinese) एकूण मुल्यांकन 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.