Christmas Bank Holidays: आठवडाभर देशातील बँका राहणार बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Christmas Bank Holidays: बँकांमध्ये काही महत्वाची कामं अडकून पडली आहेत का? हो तर हि बातमी जरूर वाचा कारण ख्रिसमसच्या काळात देशातील बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या परिसरातील बँकांच्या सुट्यांबद्दल माहिती घेऊनच कामांचे नियोजन करा. यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आज ख्रिसमस साजरा केला जात आहे.परंतु तत्पूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर पासून देशभरात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे जी कि पुढच्या चार ते पाच दिवसांपर्यंत वैध असेल, तर जाणून घेऊया 2023 च्या सर्वात शेवटच्या मोठ्या सुट्टीबद्दल…

डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्टी:

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बँका शेवटच्या आठवड्यात सलग पाच दिवसांसाठी बंद असणार आहेत. 2023 या वर्षाला कायमचा निरोप देण्यासाठी आता केवळ एक शेवटचा आठवडा बाकी आहे आणि काही राज्यांमध्ये ख्रिस्तमसच्या निमित्ताने सलग पाच दिवसांची सुट्टी घोषित करण्यात आली आहे. बॅंकांमधली काही कामं जर का अडकून पडलेली असतील तर आता मात्र तुम्हाला बँकांच्या सुट्यांचे वेळापत्रक तपासून पाहावे लागेल, कारण बँकेच्या कामांची तारीख उलटून गेली तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सलग पाच दिवस राहणार बँका बंद: (Christmas Bank Holidays)

ख्रिसमसनिमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 26 आणि 27 डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. अनेक दिवस बँका बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावं लागू शकतो, आणि म्हणूनच तुम्ही एकदा बँकांना देण्यात आलेल्या सुट्ट्यांची यादी तपासून घेतली पाहिजे. देशातील बँकांना सुट्टी असली तरीही घाबरून जाण्याची गरज नाही. आजकाल इंटरनेटच्या साहाय्याने अनेक कामं घरबसल्या करणे शक्य आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जर का रक्कम पाठवायची असेल किंवा टीव्ही आणि मोबाईलला रिचार्ज करायचा असेल तर यासाठी बँकेत जाण्याची गरज आता राहिलेली नाही. अगदी काही बटनांच्या साहाय्याने अशी कामं उरकून घेता येतात. तसेच तांत्रिक अडचणी येत असल्यास ATMचा वापर करून पैश्यांची रक्कम काढली जाऊ शकते.

कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या –

23 डिसेंबर 2023- चौथा शनिवार
24 डिसेंबर 2023- रविवार
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद राहतील
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे आयझॉल, कोहिमा, शिलाँग येथील बँका बंद राहतील
27 डिसेंबर 2023- कोहिमामधील बँका बंद राहतील
30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु-कियांगमुळं बँका बंद राहतील
31 डिसेंबर 2023- रविवार