CIBIL Score Check : आता UMANG अँपवर चेक करा CIBIL Score; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

बिझनेसनामा ऑनलाईन । वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण काही कामे घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो. या सोबतच आता काही एप्लीकेशनच्या माध्यमातून सिबिल स्कोर (CIBIL Score Check) देखील जाणून घेता येतो. युनिफाईड मोबाईल एप्लीकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स UMANG या ॲपच्या माध्यमातून आपण सहजरित्या आपला सिबिल स्कोर चेक करू शकतो. हे एप्लीकेशन अँड्रॉइड आणि ios साठी देखील उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाऊनलोड करू शकता. आणि तुमचा सिबिल स्कोर या अँपच्या माध्यमातून चेक करू शकता.

जर तुम्हाला छोटा किंवा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर बँक लोन ची गरज प्रत्येकाला पडत असते. त्याचबरोबर आजकाल लोक महागड्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून लोन घेत असतात. बँकेतून लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. हा सिबिल स्कोर (CIBIL Score Check) मिळवण्यासाठी आता पर्यंत युजर्सला सिबिल वेबसाईटवर जावं लागत होतं. त्याचबरोबर सिबिल स्कोर पाहण्यासाठी प्रीमियम घेणे देखील महत्वाचे होते. परंतु आता कुठेही न जाता आणि प्रीमियम न घेता तुम्हाला UMANG च्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर समजू शकेल.

अशा पद्धतीने UMANG अँपच्या माध्यमातून चेक करा सिबिल स्कोर (CIBIL Score Check)

1) सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनमध्ये UMANG ॲप डाऊनलोड करा.
2) त्यानंतर या ॲपवर तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर आणि चार डिजिट पिन टाकून लॉगिन करा.
3) किंवा ओटीपी च्या माध्यमातून देखील तुम्ही लॉगिन करू शकतात.
4) यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर पॉप्युलर सर्विस यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिसतील.
5) या ऑप्शन पैकी CIBIL या ऑप्शन वर क्लिक करा.
6) त्यानंतर कनौ your cibil scores हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
7) त्यानंतर पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्म दिनांक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, ईमेल आयडी हे सर्व डिटेल्स भरावे लागतील.
8) त्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
9) या प्रक्रियेनंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
10) तो ओटीपी टाकून सबमिट करा.
11) यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर दिसेल.

सिबिल स्कोर म्हणजे काय?

सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर देखील म्हटले जाते. सिबिल स्कोर (CIBIL Score Check) हे एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. त्यानुसार या व्यक्तीने केव्हा आणि किती कर्ज घेतलेलं आहे. हे समजतं. त्याचबरोबर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुम्ही किती रक्कम देयक लागतात हे देखील या सिबिल स्कोर मध्ये समजते. बँकेकडून लोन देण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. या सिबिल स्कोर वरूनच तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जातं. त्याचबरोबर जर तुमचा सिबिल स्कोर हा खूप कमी असेल तर तुम्हाला लोन मिळणं खूप अवघड असतं. तरीही जर तुम्हाला बँकेकडून लोन देण्यात आलं तर बँकेकडून या लोन वर जास्त व्याज लावले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या किमतीमध्ये ठरवलं जातो. जर तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर ते लोन घेण्यासाठी योग्य मानलं जाते.