बिजनेसनामा ऑनलाइन | बँक मध्ये कर्ज काढायला गेल्यास अधिकारी तुमचा Cibil Score नक्की पाहतील आणि जर का तो व्यवस्थित असेल तरच तुम्हाला लोन दिलं जाईल . पण Cibil Scoreचा अर्थ माहिती आहे का? या बद्दल महत्वाच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा. cibil scoreला credit score असही म्हटलं जातं. यानुसार तुमचा आर्थिक रेकॉर्ड कसा आहे याची पारख केली जाते. ज्यांचा सीबील स्कोअर चांगला आहे त्यांना कर्ज मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही, मात्र ज्यांचा सीबील score चांगला नाही त्यांना मात्र कर्ज मिळणार नाही, किंवा मिळालेल्या कर्जावर भरावा लागणारा व्याजदर जास्त असू शकतो. सिबिल स्कोर तपासून एका अर्थी बँक किंवा सावकार तुम्हाला कर्ज देताना विचार करत असते . दिलेलं कर्ज तुम्ही नक्की परत कराल का,? किंवा यापूर्वी तुम्ही कर्ज परत केला आहे का? ह्याची कल्पना येण्यासाठी सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
चांगला Cibil Score म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा ?
३००-९०० ही सिबिल स्कोर ची मोजपट्टी आहे. या मध्ये येणारा सिबिल स्कोर एकतर चांगला किवा वाईट मानला जातो. जर का तुमचा सिबिल स्कोर ७५० किवा त्यापेक्षा जास्ती असेल तर त्याला उत्तम मानला जातो, तसेच जर तुमचा सिबिल स्कोर ५५० -७५० च्या आसपास असेल तर तो चांगला आहे. मात्र जर का तुमचा सिबिल स्कोर ३००-५५० या मध्ये येत असेल तर तो काही चांगला नाही. इथे तुम्हाला सिबिल स्कोर सुधारण्याची गरज आहे.
सिबिल स्कोर कश्यावर अवलंबून आहे? Cibil Score
तुमचा सिबिल स्कोर हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. तुम्ही वेळेत कर्जाची परतफेड करता की नाही याचे चित्र तो तयार करतो. ह्या मध्ये 30 % तो तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर करता का यावर निर्धारित असतो. 25 % credit exposure तर 20 % कर्जाच्या वापरावर अवलंबून असतो.
तुमचा Cibil Score कसा सुधाराल?
1. घेतलेल्या कर्जाचे हप्प्ते वेळेवर भरा:
आपला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी ही फारच महत्वाची गोष्ट ठरते. घेतलेलं कर्ज वेळच्या वेळेत परत करण्याचा प्रयत्न करा. credit card चा वापर करत असाल तर वेळच्या वेळी झालेला खर्च भरून काढा.
2. Credit Card ची मर्यादा परत परत वाढवू नका:
कार्डची मर्यादा जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा वाढवता तेव्हा त्यचा अर्थ तुम्ही भरपूर अवाजवी खर्च करता असा होतो. बिलची रक्कम फार मोठी असल्यास तुमच्या कार्ड वरून payment होणार नाही आणि तुमचा क्रेडीट स्कोर आपोआप खराब होईल.
3. एकावेळी एकच कर्ज घ्या:
एकावेळी अनेक कर्ज घेतल्यामुळे EMI चा भार वाढतो. एखादे वेळी जर का EMI चुकला तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
4. जामीनदार होताना विचार करा:
तुम्ही जर कुणासाठी जामीनदार म्हणून राहणार असाल तर तो माणूस खात्रीने कर्ज परत करेल का हे तपासून घ्या. कारण त्याने केलेला उशीर तुमच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो.
5. Credit Card चा वापर मार्यादेपेक्षा जास्ती करू नका :
कार्डचा वापर गरजेच्या वेळीच करा. आणि नेहमी 30 % पर्यंत कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न करा, कमी वापरामुळे तुमचा सिबिल स्कोर चांगला राहतो. त्यामुळे क्रेडीट कार्डवर मोठी खरेदी टाळा.