बिझनेसनामा ऑनलाईन । जर तुम्हाला छोटा किंवा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर बँक लोन ची गरज प्रत्येकाला पडत असते. त्याचबरोबर आजकाल लोक महागड्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून लोन घेत असतात. बँकेतून लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर आता सिबिल स्कोर ला सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा जास्त महत्त्व आलेलं आहे. याबद्दल IBPS ने SBI बँक सोडून बाकीच्या सर्व सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अप्लाय करणाऱ्यांना सिबिल स्कोर जोडणे बंधनकारक केले आहे.
यामुळे आता नोकरी मिळवण्यासाठी कष्ट आणि अभ्यासाबरोबर चांगला सिबिल स्कोर ठेवणंही महत्वाचे बनले आहे. त्यासाठी तुमचा सिबिल स्कोर 650 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. जर तुमचा सिबिल स्कोर 650 पेक्षा कमी असेल त्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुमच्याकडे क्रेडिट स्कोर नसेल तर सरकारी नोकरीसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC देणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे ऑफर लेटर रद्द करण्यात येईल. सरकारी बँकिंग जॉब साठी जोडण्यात आलेला हा नियम अति महत्त्वाचा आहे.
काय आहे सिबिल स्कोर
सिबिल स्कोर हे एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. त्यानुसार या व्यक्तीने केव्हा आणि किती कर्ज घेतलेलं आहे. हे समजतं. त्याचबरोबर जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुम्ही किती रक्कम देयक लागतात हे देखील या सिबिल स्कोर मध्ये समजते. सिबिल स्कोरला क्रेडिट स्कोर देखील म्हटले जाते.
बँकेकडून लोन देण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. या सिबिल स्कोर वरूनच तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जातं. त्याचबरोबर जर तुमचा सिबिल स्कोर हा खूप कमी असेल तर तुम्हाला लोन मिळणं खूप अवघड असतं. तरीही जर तुम्हाला बँकेकडून लोन देण्यात आलं तर बँकेकडून या लोन वर जास्त व्याज लावले जाते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या नंबर मध्ये ठरवला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तो लोन घेण्यासाठी योग्य मानला जातो .