Cibil Score चं नाव ऐकलंय, पण तो खरोखर महत्वाचा का आहे? जाणून घ्या…

Cibil Score : तुम्ही कधी सिबिल स्कोर अशी एखादी गोष्ट ऐकलेत का? असेल तर आज हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. बँकिंगच्या क्षेत्रात सिबिल स्कोर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सिबिल स्कोर जर का चांगला असेल तर बँक किंवा वित्तीय खात्याकडून लोन मिळवणं तुम्हाला सोपं जातं. सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही ज्या प्रकारे आर्थिक घडामोडी करत असतात, त्याचा एक आराखडा बनवून तुम्हाला काही गुण दिले जातात. उदाहरणार्थ तुम्ही एका बँक कडून जर का लोन घेणार असाल तर ती बँक आधी तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहते . चांगला सिबिल स्कोर आढळून आला तर नक्कीच तुम्हाला कोणतेही कष्ट न घेता लोन मिळेल, पण हाच स्कोर जर का वाईट असेल तर लोन मिळवणं हे तुमच्यासाठी फारच कठीण जाणार आहे…

Cibil Score ला आपण Credit Score असेही म्हणू शकतो. कोणाकडूनही कर्ज घेताना जसे आपण लोनची रक्कम, किती काळासाठी आपण लोन घेणार आहोत, त्यावर लागणारा व्याजदर काय असणार आहे, गोष्टींची शहानिशा करतो त्याचवेळी आपला सिबिल स्कोर कसा आहे व तो जर का वाईट असेल तर कसा सुधारला जावा याबद्दलही विचार करणं महत्त्वाचं आहे. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या मोजपट्टीत मोजला जातो. तुमचा आकडा जर का 750 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही.

सिबिल स्कोर हा कसा ठरतो? (Cibil Score)

अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही घरचे लाईट बिल, पाण्याचे बिल, मोबाईलचा रिचार्ज वेळच्यावेळी करत असाल तर तुमचा सिबिल स्कोर चांगला राहतो. एखाद्या वेळेस जर का तुम्ही लोन घेतलं असेल तर दिलेल्या मुदतीत तुम्ही त्याची परतफेड करत आहात का, ठरलेल्या वेळी तुम्ही याची परतफेड केलेली असेल तर तुमचा सिबिल स्कोर सुधारतो. थोडक्यात सांगायचं झालं तर का तुमचा आर्थिक व्यवहार चोख असेल आणि त्यात कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसतील तर तुमचा सिबिल स्कोर हा नेहमीच उत्तम राहायला मदत होते.

चांगल्या सिबिल स्कोरचा लोन मिळवण्यासाठी कसा फायदा होतो?

तुमचा सिबिल स्कोर हा एखाद्या बँक किंवा आर्थिक संस्थेसाठी एक तुमचा प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे. चांगला सिबिल स्कोर असलेला माणूस आपल्याकडून देऊ केलेल्या लोनची रक्कम वेळेत परत करेल असा विश्वास बँकेला बसतो, व त्यानंतर तुम्हाला लोन द्यायला बँक मागे पुढे पाहत नाही. तसेच ज्या माणसांचा सिबिल स्कोर फारच चांगला आहे त्यांना इंटरेस्ट रेटवरही काही सवलती दिल्या जातात.‌

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारखा तुमचा सिबिल स्कोर सकारात्मक असेल तर मोठ्यात मोठी रक्कम सुद्धा लोन म्हणून तुम्हाला बँक कडून दिली जाऊ शकते. अश्यावेळी लोनसाठी तुम्ही केलेला अर्ज फेटाळून लावण्याची शंका फारच कमी असते. तुमचा सिबिल स्कोर जर का सकारात्मक नसेल तर घाबरून जाऊ नका,पण यापुढे तुम्ही करणारा आर्थिक व्यवहार हा चोख असेल, तुम्ही प्रत्येकवेळी घेतलेल्या रकमेची परतफेड कराल याची काळजी घ्या जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर सुधारायला मदत होईल.