Cinema Lovers Day: खुशखबर!!! 23 फेब्रुवारीला पहा 99 रुपयांमध्ये PVRला चित्रपट

Cinema Lovers Day: 23 फेब्रुवारी 2024 रोजी ‘सिनेमा लवर्स डे'(Cinema Lovers Day) आहे. या खास दिवशी तुम्ही तुमची आवडता नवीन प्रदर्शित झालेला चित्रपट तुम्ही फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहेत. PVR आणि Inox सिनेमा चेन तुमच्यासाठी ही खास ऑफर घेऊन आले आहेत. तर मग वाट कसली पाहताय? 23 फेब्रुवारीला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत PVRला जा आणि तुमच्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घ्या!

सिनेमाप्रेमींसाठी खास दिवस: (Cinema Lovers Day)

PVR-Inox या multiplex चेनकडून सिनेमा लवर्स डे साजरा केला जात आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या सवलतीच्या दरांमध्ये तुमच्यासाठी सर्व मुख्य प्रवाहातील चित्रपट समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रीमियम सिनेमा Format आणि Recliner seat यांवरही मोठ्या प्रमाणात सूट दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता रीक्लाइनर सीट्समध्ये फक्त 199 रुपयांमध्ये!

होय, ही बातमी पूर्णपणे खरी आहे. सिनेमा चेनने रीक्लाइनर सीट्सच्या टिकिटाच्या किमतीत मोठी कपात केली आहे, यामुळे आता तुम्ही अधिक आरामदायीपणे आणि बजेटमध्ये चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. तसेच, IMAX, 4DX, MX4D आणि गोल्ड सारख्या प्रीमियम श्रेणीतील चित्रपटांसाठीही टिकिटाच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे(Cinema Lovers Day), यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद एका अविस्मरणीय अनुभवातून घेण्याची संधी मिळेल.