Coca Cola Tea : Coca Cola कंपनी आता विकणार चहा; ऑनेस्ट टी बाजारात येण्यास सज्ज

बिझनेसनामा ऑनलाईन । Coca Cola हि शीतपेयाची कंपनी आपल्यापैकी अनेकांच्या पसंतीची असेल. गेल्या अनेक वर्षांपासून शीतपेयाचा हा ब्रँड जगभरात आपले नाव कमावत आहे. मधल्या काळात Coca Cola च्या विरुद्ध काही वाद विवाद देखील झाले होते तरीही कंपनीने तिच्या ग्राहकांचा विश्वास जिंकत व्यवसाय सुरूच ठेवला, आणि क्षणार्धात पुन्हा एकदा त्यांचा व्यवसाय पूर्ववत झाला. आता हि कंपनी चहा सुद्धा विकणार आहे. ऑनेस्ट टी या ब्रँडच्या नावाखाली कंपनी चहा विकण्यास (Coca Cola Tea) सज्ज झाली आहे.

Coca Cola ची ऑनेस्ट टी : (Coca Cola Tea)

Coca Cola चं नाव कानावर पडताच थंड वाटतं, कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण Coca Cola च्या शीतपेयाचा आस्वाद घेत आलोय, पण आज जर का आम्ही म्हणालो कि आता याच कंपनीचा चहा देखील मिळणार आहे तर तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही!! ठेवावा लागेल कारण Coca Cola बाजारात घेऊन आलीये कंपनीचा नवीन चहा, त्यामुळे शीतपेयासोबत चहा सुद्धा Coca Cola ची कंपनी विकत आहे यावर विश्वास ठेवावा लागेल. या चहाची मजा घेण्यासाठी ना तुम्हाला दुधाची गरज आहे ना साखरेची म्हणूच याला रेडी टू ड्रिंक- ओनेस्ट टी (Coca Cola Tea) असं नाव देण्यात आलंय.

बुधवारी कंपनीने या नवीन पेयाची माहिती माध्यमांना दिली. Coca Cola कंपनीचे सहाय्यक ओनेस्ट या नवीन चहाच्या खरेदी विक्रीची जबाबदारी सांभाळतील. चहा बनवण्यासाठी लागणारे पदार्थ कोलकाता येथील लक्ष्मी टी कंपनी प्रायवेट लिमिटेड कडून विकत घेतले जाणार आहेत. चहा म्हटलं कि आता त्यात वेगवेगळे प्रकार सामील होतात त्यामुळे Coca Cola कंपनी आपल्या सर्व ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आईस टी, लिंबू आणि तुळशीच्या वेरीयंटचा चस्का मिसळून बाजारात आणण्यासाठी सज्ज झाली आहे.