Cochin Shipyard Share 20% ने वाढले; ‘या’ कारणामुळे शेअर्स तेजीत

बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी जहाज बनवण्याची कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये (Cochin Shipyard Share) मोठी वाढ झाली आहे. या कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे मध्ये जवळजवळ 20% वाढले व त्यांनी अप्पर सर्किटचा पल्ला गाठला. कंपनीच्या प्रोडक्सची विक्री वाढल्यामुळे शेअर्समध्ये चांगलीच तेजी आली. कालच्या . दिवसाच्या शेवटी हे शेअर्स BES वर 20 टाक्यांसह 1146.15 रुपयांवर थांबले. कोचीन शिपयार्ड या कंपनीचे मार्केट कॅप 15,076.50 करोड रुपये आहे.

का झाली कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये वाढ? Cochin Shipyard Share

कोचीन शिपयार्डला हल्लीच एक मोठी ऑर्डर मिळाली. या ऑर्डरमुळेच खरं तर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ही ऑर्डर इंडिअन नेवी कडून देण्यात आली होती, इथे कोचीन शिपयार्डला मिसाईल वेसल्स बनवायच्या होत्या. या एका ऑर्डरमुले कंपनीची बुक ऑर्डर वाल्यू वाढली. हल्ली भारत सरकार कडून बंदर (Port) आणि Water Infrastructure कडे भरपूर लक्ष दिलं जात आहे, यामुळेच देशातील अनेक शिपयार्डसना प्रगती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या शिवाय कोचीन शिपयार्डला नेदरर्लंडच्या IHC नावाच्या मोठ्या कंपनी व द्रेजिंग कोर्पोरेशन ऑफ इंडियाची अजून एक भली मोठी ऑर्डर मिळाली होती. कंपनीचं काम बघता या ऑर्डर्स मध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

कोचीन शिपयार्डची येणारी परिस्थिती कशी असेल?

Rating Agency India Rating and Research कडून अशी माहिती समोर आली आहे की येणारा काळ हा कोचीन शिपयार्डसाठी फारच महत्वाचा असणार आहे, दिवसेंदिवस कंपनीला फायदा होण्याची शक्यता जास्ती आहे. काही दिवसातच कोचीन शिपयार्डचा Operational Revenue वाढेल व यामुळे कंपनीचे शेअर्स सुद्धा चांगल्या प्रकारे वाढतील.

कोचीन शिप्यार्डने 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहिती नुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्येक शेअरवर (Cochin Shipyard Share) 3 रुपयांचा final dividend दिला जाईल, यासाठी रीकॉर्ड तारीख 21 सप्टेंबर अशी आहे. Board Of Directors मधून याला परवानगी मिळालेली असून आत Annual General Meeting मध्ये याला मान्यता मिळाल्यानंतर 27 ऑक्टोबर पर्यंत शेअर होल्डर्स मध्ये वाटणी केली जाईल.