बिझनेसनामा ऑनलाईन । येत्या दोन आठवड्यात सप्टेंबरचा महिना संपेल, आणि यासोबतच 2023- 24 या आर्थिक वर्षाचे सहा महिने पूर्ण होतील. यामुळे येत्या 30 सप्टेंबरपूर्वी अनेक आर्थिक कामांची आणि बदलांची मुदत संपत आहे. त्यामुळे आता उशीर करू नका. वेळीच खालील कामे लवकरात लवकर उरकून घ्या अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणकोणती कामे आहेत जी तुम्ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली पाहिजेत.
१) PPF,SCSS आणि NSC:
PFF, जेष्ठ नागरिक बचत योजना आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी इथे मोठी बातमी आहे. या सर्व लोकांना 30 सप्टेंबरच्या आत जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन आधार कार्ड जमा करणे अनिवार्य आहे, तसे न केल्यास त्यांनी केलेली गुंतवणूक अमान्य धरली जाईल. भरीस भर म्हणून अर्थ मंत्रालयाकडून या योजनांसाठी आत्ता पॅन कार्ड देखील अनिवार्य केले आहे. अर्थ मंत्रालयाच्या 31 मार्च 2023च्या सूचनेनुसार खातेधारकांनी आधार नंबराची नोंद करवणे महत्वाचे आहे, यासाठी सहा महिन्यांचा कालावधी सुद्धा निश्चित करण्यात आला होता जो कि सप्टेबर 2023 मध्ये संपणार आहे.
२) SBI We-Care:
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या We-Care योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. इथे जेष्ठ नागरिकांना FD सर्वाधिक वर 7.5% व्याज दिलं जातं. हे व्याज नवीन डेपोझीटवर आणि डेपोझीटच्या रीनिवलवर देऊ केला जातो.
३) IDBI अमृत महोत्सव FD:
IDBIच्या अमृत महोत्सवी योजनेत बँकेकडून 375 दिवसांसाठी 7.60% व्याज देऊ केले जात आहे. जेष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 7.60% असा निश्चित करण्यात आला आहे व 444 दिवसांसाठी जेष्ठ नागरिकांना 7.65% तर इतरांसाठी 7.15% व्याज निश्चित करण्यात आला आहे. IDBI बँककडून या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. त्यामुळे तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल तर उशीर करू नका.
४) Mutual Funds:
Mutual Fundsच्या गुंतवणूकदरांसाठी नोमिनी डीटेल्स देण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. २८ मार्च २०२३ ला सेबीने याबाबत एक परिपत्रक जारी केलं होते. त्यामुळे घाई करा.
५) 2 हजारांची नोट:
RBI कडून 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जर अजूनही तुमच्याकडे २ हजारांच्या नोटा बाकी असतील तर मुदत संपायच्या आत त्या बदलून घ्याव्यात. अन्यथा त्या नोटांची किंमत शून्य राहील.