Concord Biotech IPO । जुलै महिन्या प्रमाणेच ऑगस्ट महिन्यात देखील बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांसाठी ओपन करण्यात येणार आहे. 1-2 दिवसापासून शेअर मार्केटमध्ये आलेल्या घसरणीनंतर आता शेअर मार्केटला चांगले दिवस आले आहे. हे पाहता आता काही कंपन्यांनी देखील शेअर मार्केटमध्ये त्यांचे IPO खुले केले आहे. तर बऱ्याच कंपन्या आता या आठवड्यामध्ये त्यांच्या कंपन्यांचा IPO गुंतवणूकदारांसाठी ओपन करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कॉनकॉर्ड बायोटेक कंपनी उद्या आपला IPO बाजारात आणणार आहे.
अहमदाबाद येथील फार्मा कंपनी कॉनकॉर्ड बायोटेक (concord Biotech ) उद्या म्हणजेच शुक्रवारी 4 ऑगस्टपासून आपला IPO गुंतवणूकदारांसाठी खुला करणार (Concord Biotech IPO)आहे. त्याचबरोबर हा आयपीओ 8 ऑगस्ट ला बंद करण्यात येणार असून गुंतवणूकदार 8 ऑगस्टपर्यंत यामध्ये पैसे गुंतवू शकतात. कॉनकॉर्ड बायोटेक या कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. या आयपीओची साईज 1551 करोड रुपये आहे.
705 ते 741 रुपये प्रति शेअर प्राईझ बँड – (Concord Biotech IPO)
कॉनकॉर्ड बायोटेक या कंपनीच्या आयपीओ चा प्राईस ब्रँड 705 ते 741 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या आयपीओ मध्ये ऑफर फॉर सेल च्या माध्यमातून हेलिक्स इन्व्हेस्टमेंट 2.09 करोड इक्विटी शेअर्स विक्री होणार आहे. यासोबतच विक्री झालेले शेअर्स 50 टक्क्यांपर्यंत क्वालिफाईड इन्टिट्यूशनल बायरसाठी आरक्षित करण्यात येणार असून 15 टक्के नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी हे शेअर रिझर्व करण्यात येणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी 35 टक्के शेअर देण्यात येणार आहे.
कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रिप्शन साठी आयपीओ च्या माध्यमातून 10,000 इक्विटी शेअर्स देण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक इक्विटी शेअर वर 70 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीच्या शेअर्सच्या जीएमपी बद्दल बोलायचं झालं तर ते 200 रुपयांच्या प्रीमियमवर आहे. यासोबतच लिस्टच्या दिवशी गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होऊ शकतो..