Countries Without Passport From India : Passport शिवाय शक्य आहे या देशांचा प्रवास; तुम्ही सुद्धा करू शकता बिनदास्त सफर

Countries Without Passport From India : विदेशात फिरायला जायचं आहे का? नक्कीच जाऊ शकता पण गरज असते ती Passport ची…. Passport तुम्हाला परदेशात जाण्याची मजा घेऊ देतो. आपल्या देशात फिरताना या अटींची गरज नसते मात्र विदेशात जायचे असल्यास Passport शिवाय पर्याय नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की काही ठिकाणी हे नियम बदलेले असून काही देशात Passport शिवाय प्रवास करण शक्य झालं आहे. तर आज जाणून घेऊया अशाच काही देशांबद्दल जिथे Passport शिवाय प्रवास केला जाऊ शकतो.

अनेकांना विदेशी फिरण्याची इच्छा असते. तिथले लोक कसे वावरतात, त्यांची बोली भाषा कशी असते, कुठले खाद्य पदार्थ तिथे आवडीने खाल्ले जातात , त्यांची संस्कृती कशी आहे, तिथली पर्यटन स्थळे कोणती अशी अनेक आकर्षणे आपल्याला परदेशात घेऊन जात असतात.

या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला Passport ची गरज नाही: Countries Without Passport From India

काही देशांमध्ये जाण्यासाठी Passport ची गरज नसते, केवळ एका ओळखपत्राच्या मदतीने तुम्ही या देशांमध्ये प्रवास करू शकता. जर का तुमचं वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्ती असेल तर केवळ आधार कार्डच्या मदतीने तुम्ही भूतान आणि नेपाळमध्ये प्रवास करू शकता. यातील भूतानमध्ये जाण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड यांचा वापर केला जाऊ शकतो. तेच मुलांसाठी केवळ जन्म दाखला, किंवा शाळेचा दाखला पुरेसा ठरतो. तर दुसरीकडे नेपाळमध्ये जाण्यासाठी तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करणारा कोणताही दाखला पुरेसा आहे. या दोन्ही देशांशिवाय, मकाऊ, जमैका, बार्बाडोस या ठिकाणी सुद्धा तुम्ही पासपोर्ट शिवाय (Countries Without Passport From India) फिरू शकता.

या देशात फिरण्यासाठी Visa सुद्धा गरजेचा नाही:

काही देश असेही आहेत जिथे फिरण्यासाठी तुम्हाला Passport तर आवश्यक आहे मात्र Visaची सक्ती नाही. या देशांमध्ये मालदीव्स, मोरीशिस, श्रीलंका , कतार, युगांडा, इराण इत्यादी देशांचा समावेश होतो.