Credit Card New Rules: क्रेडिट कार्डच्या ‘या’ नियमामध्ये बदल; जाणून घ्या तुम्हाला कसा होईल फायदा

Credit Card New Rules: देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड बाबत काही नियमांमध्ये फेरबदल केलेले असल्याने तुम्हाला याची माहिती असणे महत्वाचे आहे. तांत्रिक बदल घडत असले तरीही आपल्यापैकी अनेकजण आजही क्रेडिट कार्डचा वापर बऱ्यापैकी करताना दिसतात. आज समोर आलेली बातमी सांगते की नवीन नियमांनुसार क्रेडिट कार्ड धारक Billing Cycle मध्ये अनेक वेळा बदल करू शकणार आहेत, यापूर्वी काही संस्थानी एकापेक्षा अनेक बदलांवर रोख लावली होती, मात्र या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकत

Billing Cycle काय आहे? (Credit Card New Rules)

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर किती खर्च केलाय याचा हिशोब कधी येतो? तर त्याचं उत्तर आहे बिलिंग चक्र! (billing cycle). तुमच्या क्रेडिट कार्डाचं स्टेटमेंट (statement) येण्याआधीचा आणि खर्च करण्याचा कालावधी म्हणजेच billing cycle होय. समजा तुमचं स्टेटमेंट दर महिन्याच्या 6 तारखेला येतं तर तुमची billing cycle त्याआधीच्या महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होऊन 6 तारखेपर्यंत चालेल. म्हणजे या कालावधीत तुम्ही केलेल्या खरेदी आणि पेमेंटचा समावेश तुमच्या पुढच्या स्टेटमेंटमध्ये होतो.

क्रेडिट कार्डचे नवीन नियम काय आहेत?

वरती म्हटल्याप्रमाणे सर्वोच्य बँकेच्या नवीन निर्णयानुसार आता ग्राहक Billing Cycle मध्ये एकापेक्षा अनेकवेळा बदल करू शकणार आहेत, मात्र यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डवरची जुनी देणी वसूल झालेली असली पाहिजेत. सोबतच याबद्दल तुम्ही Email किंवा फोनद्वारे तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे.

सर्वोच्य बँकेच्या नवीन नियमानुसार तुम्हाला बिल भरण्याची तारीख आखणं सोपं जाईल(Credit Card New Rules), तसेच क्रेडिट कार्डच्या संबंधित अनेक चढ उतार सोपे होतील. कारण यापूर्वी क्रेडिट कार्ड कंपनीकडून billing cycle चा अवधी ठरवला जायचा, मात्र आता यात बदल झाल्याने ग्राहकांना भरगोस फायदा मिळणार आहे.